Maharashtra Vidhan Sabha Election : नेत्यांसाठी आज 'जुगाड' दिवस ; बंड शमविण्यासाठी 'ऑपरेशन समजूत' सुरु

Maharashtra Vidhan Sabha Election withdraw candidatur mahayuti mva: नेत्यांनी विधानपरिषद, जिल्हा परिषद अध्यक्ष, महामंडळ अध्यक्षपद अशी 'ऑफर' दिली आली आहे. तरीही बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

बंडखोर उमेदवारांनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचीही डोकेदुखी वाढवली आहे. आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ एकच दिवस (सोमवार)शिल्लक आहे. शनिवारी व रविवारी शासकीय सुटी असल्याने या दोन दिवशी माघार घेता येणार नाही. त्यामुळे बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी आजच्या (रविवार) दिवशी 'जुगाड' करावा लागणार आहे.

चांद्यापासून बांद्यापर्यंत महायुती आणि महाआघाडीतील बंडखोरांनी धक्के दिले आहेत. त्यांचे बंड शमविण्यासाठी नेत्यांनी 'ऑपरेशन समजूत' हाती घेतले आहे. पण अद्याप उमेदवारी मागे घेण्याचा शब्द कोणत्याही उमेदवाराने दिलेला नाही. नेत्यांनी विधानपरिषद, जिल्हा परिषद अध्यक्ष, महामंडळ अध्यक्षपद अशी 'ऑफर' दिली आली आहे. तरीही बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम आहे.

सोमवार दुपारपर्यंत बंडखोर उमेदवारांच्या माघारीचे चित्र स्पष्ट होईल. अनेक बंडखोर उमेदवारांकडे राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांकडून नाराजी दूर करून, समझोता करण्यासाठी काही दूत पाठविण्यात आले होते.पण, नेत्यांच्या दुतांकडून करण्यात आलेले प्रयत्न अपूर्ण पडत असल्याचे चित्र आहे.

बंडखोरांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत बंडखोरी टाळण्याबाबत नियोजन होणार असल्याची माहिती दिली.उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या (सोमवार) शेवटचा दिवस असल्याने आज बंडखोर आमदारांना समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Maharashtra Politics
Arvind Sawant: अरविंद सावंतांना 'उपरती'; शिवसेना उमेदवाराला 'माल' म्हटले नंतर दिलगिरी, उशीरा सुचलेले शहाणपण!

काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आज बंडखोर उमेदवारांची समजूत काढणार आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून दोघेही बंडखोर उमेदवारांना फोन करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये कुठेही बंडखोरी नको या उद्देशाने, जे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले जाणार असल्याची माहिती आहे.

आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही सोमवारपर्यंत (ता. 4) आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आलेली शिष्टाई किती उपयोगी पडली, हे सोमवारीच समजणार आहे. आज मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.बंडखोरांचे बंड शमवण्यात राजकीय पक्ष किती यशस्वी होतात की बंडखोर बंडाचा झेंडा घेऊन मैदानात उतरतात, हे सोमवारीच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com