धक्कादायक : पोलीस ठाण्यातच महिला पोलीस असुरक्षित ; हवालदारानेच केला विनयभंग

खार पोलिस ठाण्यात सहकारी महिला पोलिसाचा हवालदाराने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
women police
women police sarkarnama

मुंबई : ''महिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा करायचा नाही, पोलीस (police) ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या महिलेला न्याय दिला पाहिजे, तिच्या तक्रारीचे निराकरण केले पाहिजे,'' असे स्पष्ट आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. (women police are unsafe in mumbai)

पोलीस ठाण्यातील एका हवालदारानेच सहकारी महिला पोलीस शिपायासोबत असभ्य वर्तन केल्याची घटना उघडकीस आल्याने पोलीस खात्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस ठाण्यातच महिला पोलीस असुरक्षित असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

women police
तृप्ती देसाई करणार 'त्या' कीर्तनकाराचा भांडाफोड ; अश्लील व्हिडिओ व्हायरल

मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात सहकारी महिला पोलिसाचा हवालदाराने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हा या महिला अधिकाऱ्याला व्हॅाट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवत होता. तो या महिला अधिकाऱ्यांचाही पाठलाग करायचा, असे पोलिसांनी सांगितले.

women police
नार्वेकरांनी परबांना रोखलं ; हातातील माइक काढून घेतला, अन्..

दरम्यान ८ एप्रिल रोजी आरोपी शिपाईने महिला अधिकारीच्या मोबाइलवर रात्री १२ च्या सुमारास प्रपोजल मेसेज पाठवला. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या त्रासाला कंटाळून या महिला अधिकाऱ्याने संबधित सहकारी पोलिस हवालदाराच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात ३५४(ड), ५०९, भा.द.वि सह ६७ माहिती तंत्रज्ञान अॅक्टनुसार गुन्हा नोंदवला आहे.

महिला पोलिस शिपायाची छेड अथवा फसवणुकीचा हा काही पहिलाच गुन्हा नाही, नुकतीच विलेपार्ले पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीच्या प्रकरणांमुळे महिला सुरक्षित नसल्याची टिका केली जात असताना या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील महिलाही असुरक्षित असल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com