Worali Hit And Run Case Update : वरळी हिट अ‍ॅन्ड प्रकरणी मोठी बातमी! मुख्य आरोपी फरार मिहीर शाहाला अखेर अटक

Mihir Shah Arrest : अपघातानंतर मिहीर शाहा फरार होता. मुंबई पोलिसांनी त्याला शाहापूर येथून अटक केली आहे.
Worali Hit and run - Mihir Shah
Worali Hit and run - Mihir ShahSarkarnama

Mumbai Police Arrests Mihir Shah : वरळी हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते जयेश शाहा यांचा मुलगा मिहीर शाह याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मिहीर पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली होती. आता त्याला शाहापूर येथून अटक करण्यात आली आहे.

अपघातानंतर आरोपी मिहीर शाहा फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याचे वडील राजेश शाहा यांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यांची अटक बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. अघातानंतर मिहीरसह त्याची आई आणि बहीणही गायब झाल्या होत्या. त्यामुळे मुंबई पोलिसांपुढे मुख्य अरोपी असलेल्या मिहीरला अटक करण्याचे आव्हान होते.

आता वरळी पोलिसांनी शाहापूर येथून मिहीर शाहाला अटक केली आहे. तसेच त्याला मदत करणाऱ्या 12 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा अपघात रविवारी पहाटे झाला होता. यात त्याने कावेरी यांना सुमार दीड ते दोन किलोमीटर फरपटत नेले होते. त्यानंतर फरार झालेला आरोपी मिहीर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे विविध चर्चांनाही सुरूवात झाली होती.

दरम्यान, मिहीरच्या चालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता गाडी मिहीरच चालवत असल्याचे सांगितले. दीड किलोमीटर महिलेला फरफटत नेल्यानंतर मिहीरने गाडी चालकाच्या हातात दिली. तसेच त्याने वडीर राजेश शाहा यांना कॉल केला. त्यावेळी त्याला पळून जाण्यास सांगितले. तसेच या गुन्ह्याची जबाबदारी चालकाला घेण्यास सांगितले होते. हे सर्व मिहीरच्या चालकाने पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबाद स्पष्ट केले आहे. तर मृत कावेरी यांच्या पतीनेही मिहीरच कार चालवत असल्याचा दावा केला.

Worali Hit and run - Mihir Shah
Nana Patole: मुख्यमंत्र्यांच्या शिलेदाराचं जुनं प्रकरण नाना पटोले उकरून काढणार

अपघातात नेमकं काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मिहीर शाह जुहू येथील वाइस-ग्लोबल तापस बारमध्ये पार्टीसाठी घरून निघाला. त्यावेळी तो वडिलांकडे नोंदणीकृत मर्सिडीज चालवत होता. त्याच्यासोबत चार मित्र होते. रात्री 11 वाजेपर्यंत पाच जणांनी बारमध्ये पार्टी केली. सकाळी 1.15 वाजता (सोमवारी) मिहीर शाहने त्याच्या मित्रांना - मर्सिडीजमध्ये - घरी परत केले.

पहाटे 4 वाजता त्याने आपल्या चालकाला बीएमडब्ल्यूमध्ये मरीन ड्राइव्हवर 'जॉय राईड'साठी घेऊन जाण्यास सांगितले. पहाटे 5 वाजता मरीन ड्राईव्हवरून ते घराकडे वळले. घरी जाताना मिहीरने आपल्या चालकाकडून गाडीचा ताबा घेतला. त्याने पहाटे 5.30 वाजता दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर त्याने महिलेला दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. हे सर्व सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

Worali Hit and run - Mihir Shah
Devendra Fadnavis-Nawab Malik फडणवीस-मलिक पुन्हा समारोसमोर; फडणवीसांनी साधला संवाद, मलिकांचा हात जोडून नमस्कार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com