Worli Hit And Run Case : वरळी अपघातातील घटनाक्रम उलगडला; पोलिसांच्या हाती मोठी माहिती

Mumbai Police : वरळी हिट अँड रन प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याने पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. यासाठी त्यांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.
Worli Hit Run Car
Worli Hit Run CarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Crime News : पुण्यातील पोर्श कार अपघाताने राज्य हादरले असतानाच शिंदे गटातील नेत्यांच्या मुलाच्या हिट अॅन्ड रन प्रकरणाने मुंबई हादरली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून मुख्य आरोपी पसार आहे. या प्रकरणी आरोपी मुलाचे वडील शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम पुढे आला आहे.

राजेश शहा यांचा मुलगा मिहिरने आपल्या अलिशान कारने रविवारी पहाटे एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या पत्नीचा मृत्यू झाला. वरळी कोळीवाडा परिसरातील नाकवा कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला निघाले होते. तेथून परतताना त्यांच्या दुचाकीला मिहिर शहाच्या कारची धडक बसली. घटनेनंतर मिहिर पसार झाला असून पोलिसांनी त्याचे वडील राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. या अपघाताकडे राजकीय कनेक्शन असल्याने राज्याचे लक्ष आहे.

असा आहे घटनाक्रम

हा अपघात अट्रिक मॉलजवळ झाल्यानंतर आरोपी मिहिर पळून गेला असला तरी यापूर्वी काय झाले होते, त्याचे सर्व खुलासे समोर आले आहेत. मिहीर शहा हा रात्री जुहूमधील व्हाईस ग्लोबल बारमध्ये गेला होता. बारमधून तो गोरेगावला घरी गेला. त्यावेळी आपल्या चालकला लाँग ड्राईव्हला जाऊ म्हणत तो मुंबईत आला.

मुंबईतून पुन्हा गोरेगावला जाताना मिहीर गाडी चालवत होता. अट्रिक मॉलजवळ त्याने दुचाकीला धडक दिली. यावेळी मिहीर शहाने मद्य प्राशन केल्याचे समोर आले. मात्र बारच्या मालकानेही काही बाबी सांगितल्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

Worli Hit Run Car
Sharad Pawar : अजितदादांना मोठा धक्का, नाना महालेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

बार मालक काय म्हणाले ?

व्हाईस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिहीर आपल्या चार मित्रांसह शनिवारी रात्री 11 च्या सुमारास मर्सिडीजमधून आला होता. त्यांच्यासोबत मुलगी नव्हती. तेथे बसल्यानंतर बिल भरूनल्यानंतर ते रात्री 1.28 ला मर्सिडीजमधूनच निघून गेले. सर्वांनी एक एक बिअर प्यायली, त्यावेळी चौघेही नॉर्मल होते. मात्र मर्सिडीजमध्ये आलेला आणि मर्सिडीजमध्येच गेलेल्या मिहिरने बीएमडब्ल्यू कारने धडक दिली.

सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त

अपघातानंतर पोलिसांनी जोरदार तपास सुरू केला आहे. त्यासाठी बारमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. बार मालकाकडून पोलिसांना हवी असलेली सर्व माहिती घेतली आहे. बारचे झालेले 18730 रूपयांचे बिल मिहिरच्या मित्राने भरले होते. तर मिहिरचे ओळखपत्र तपासूनच त्यांना एंट्री दिल्याचेही बार मालकाने सांगितले.

अपघातात नेमकं काय घडलं?

वरळी कोळीवाडा परिसरातील नाकवा हे कोळी दाम्पत्य माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला निघाले होते. तेथून मासे घेऊन दुचाकीवरुन ते परतत होते. त्यांच्याकडे खूप सामान आणि मासे होते. ते अट्रिक मॉलजवळ आले त्यावेळी पतीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कारला धडकल्याची माहिती मिळत आहे.

ते दोघेही कारच्या बोनेटवर पडले. त्यावेळी पतीने तात्काळ बाजूला उडी घेतली, महिलेला मात्र काहीही करता आले नाही. या प्रकरालामुळे चालक मिहिर शहा घाबरला आणि कारची रेस वाढवली. परिणामी बोनेटवर पडलेली महिला फरफटत गेली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Worli Hit Run Car
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंचा फोटो एकनाथ शिंदे का वापरू शकतात? उद्धव ठाकरेंनीच सांगून टाकलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com