Budget Session : महिला धोरणासंबंधी लक्ष्यवेधी मांडताना यशोमती ठाकूरांना अश्रू अनावर...

ज्यावेळी महिला धोरणाचा अभ्यास करत होते त्यावेळी मी त्याला इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण असंच म्हटलं होत.
Budget Session | Yashomati Thakur
Budget Session | Yashomati Thakur Sarkarnama

Budget Session : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरु आहे. आज महिला दिनानिमित्त महिला आमदारांना लक्ष्यवेधी मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं होते. विधी मंडळाच्या विधानसभेत महिला धोरणावर लक्षवेधी मांडताना कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना अश्रू अनावर झाले.

''खऱ्या अर्थाने आज सातबाऱ्यावर महिलांची नावे लावली जातात का, या प्रश्नानेच यशोमती ठाकूर यांनी सभागृहात महिला धोरणाची लक्ष्यवेधी मांडण्यास सुरुवात केली.त्या म्हणाल्या,' मी दुसऱ्याचे उदाहरण देत नाही, माझं स्वत:च उदाहरण देते, माझे यजमान गेल्यावर मलाही मोठा संघर्ष करावा लागला, मी मोठ्या घरातली होती, मोठ्या कुटूंबात माझं लग्न झालं, आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मी सधन होते. पण अजूनही माझ्या मुलांची नावे सातबाऱ्यावर लावायला माझ्यासारख्या महिलेला संघर्ष करावा लागतो. माझ्या यजमानांना जाऊन आज १८ वर्षे झाली पण अजूनही माझ्या मुलांच्या हक्काच्या प्रॉपर्ट्या त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत, असे सांगतानाच यशोमती ठाकूर यांना अश्रू अनावर झाले.

Budget Session | Yashomati Thakur
Shinde Fadnavis Government : शिंदे फडणवीस सरकार 'महिला धोरणा'च्या घोषणेचा आजचा मुहूर्त साधणार का?

राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री राहिलेली महिला आज तुमच्यासमोर महिलांची खरी परिस्थिती मांडत आहे. जर मला हा त्रास होत असेल तर सर्वसामान्य महिलांना आज काय त्रास होत असेल याचा तुम्ही विचारही करु शकत नाही. कोरोना काळात आम्ही सत्तेत होतो, तेव्हा मी महिला व बालकल्याण मंत्री म्हणून काम करत होते.या काळात महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात प्रवास सुरु होता. प्रत्येक एक-दोन किलोमीटर वर महिलांसाठी टॉयलेट असायलाच हवेत, असा नियम महिला धोरणात असायलाच हवा आणि त्याचे तो प्रत्यक्षात अंमलातही आणला जावा, अशी मागणी यावेळी ठाकूर यांनी केली. मी ज्यावेळी महिला धोरणाचा अभ्यास करत होते त्यावेळी मी त्याला इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण असंच म्हटलं होत.

शेजारच्या कर्नाटक राज्यात प्रत्येक एक-दोन किलोमीटरवर लेडिज टॉयलेट दिसून येतात, पण कर्नाटकातून बेळगावातून कोल्हापुरात आल्यावर त्यांच इम्प्लिमेंटेशन झालेलं दिसत नाही. खरंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करताना नॅशनल हायवेवरुन केले जातात, हे नॅशनल हायवे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. केंद्र सरकारनेही या धोरणावर लक्ष्य द्यायला हवं, असंही यावेळी यशोमती ठाकूर यांनी नमुद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com