राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे व्हायचयं!

'या बिनडोकगिरीकडे लक्ष न देता आपण संविधान वाचलं पाहिजे,''
Raj Thackeray,Yashomati Thakur
Raj Thackeray,Yashomati Thakursarkarnama
Published on
Updated on

अमरावती : हनुमान चालीसा आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून जोरदार टीका होत आहे. या दोन मुद्दांवरुन महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. या परिस्थितीवर काँग्रेस नेत्या, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

यशोमती ठाकुर यांनी अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथे भीम टेकडी येथे आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ''मनसे हा संपलेला पक्ष आहे, राज ठाकरे हे स्वतः बाळासाहेब ठाकरे बनायला पाहत आहे, कारण त्यांची राहणीमान, कपडे हे यावरून हे दिसून येत आहे.

Raj Thackeray,Yashomati Thakur
PMC Elections : कुणाला तिकीट मिळणार ; अजितदादांच्या इच्छुकांना कानपिचक्या

''राज ठाकरेंनी एक कहाणी रचली व त्यावरून वाद सुरू आहे,'' असेही मंत्री यशोमती ठाकुर म्हणाल्या. ''या बिनडोकगिरीकडे लक्ष न देता आपण संविधान वाचलं पाहिजे,'' असेही यशोमती ठाकुर यांनी यावेळी भीम सैनिकांना सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती केली. यावेळी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. या महाआरतीला पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी भगवी शाल आणि गदा देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले. शिवाय ढोलताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं होतं.

Raj Thackeray,Yashomati Thakur
भाजप आमदार नाईक यांच्यावर गुन्हा दाखल ; २७ वर्ष 'लिव्ह इन'मध्ये असल्याचा महिलेचा दावा

मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत तर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणारे राज ठाकरे येत्या हनुमान जयंतीला काय करणार याच्या चर्चा होत्या. अखेर काल हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात महाआरती झाली. राज ठाकरे यांच्या या महाआरतीनिमित्त पुण्यात मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करत पोस्टरबाजी केल्यानं चर्चा झाली होती. गुढीपाडव्यानिमित्त मुंबई आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेतून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. ५ जून रोजी राज ठाकरे हे अयोद्धा दैारा करणार आहेत. तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे अयोद्धा दैाऱ्यावर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com