Sharad Pawar News : यशवंतराव चव्हाण यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली होती; पवारांनी सांगितली 'ती' आठवण

माझ्या डोळ्यासमोर आज ना. धों. महानोर येत आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यात माझ्यावरही एक जबाबदारी होती. आपल्या घराचं ग्रंथालय करावं, अशी त्यांची अपेक्षा होती. आम्ही लोकांनी त्यांच्या गावी म्हणजे कराड येथे ग्रंथालय उभे केले, अशी आठवण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितली. (Yashwantrao Chavan entrusted me with a responsibility: Sharad Pawar)

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. ते म्हणाले की, गेली १२५ वर्षे ही संस्था काम करत आहे. सुमारे १०- ११ लोक एकत्र आले आणि पैसे जमा करून ही संस्था उभी केली. समृद्धीचं मोजमाप करायचं असेल, तर सोने नाणे नव्हे; तर त्या संस्थेची सांस्कृतिक पातळी किती उंच आहे, हे पाहावं लागेल.

Sharad Pawar
Thackeray Vs Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी सतत तोंड उघडणारे ‘या’ गोष्टीवर गप्प का?; आदित्य ठाकरेंचा गोगावलेंवर निशाणा

माझ्या डोळ्यासमोर आज ना. धों. महानोर येत आहेत. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. शेती मातीशी रममाण झालेला व्यक्ती म्हणून ना. धों यांचं नाव समोर येतं. आजच्या कार्यक्रमात ना. धों नसल्याची जाणीव प्रकर्षाने होते आहे, असे पवार म्हणाले.

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घरात व्यंकोजी राजे जन्माला आले, हे आपल्याला माहिती आहे. ते तंजावरला राहायला गेले होते, त्यावेळी त्यांनी तिथं एक संग्रहालय तयार केले होते. त्यात महाराष्ट्रासंदर्भातील माहिती मिळते. तिथं सरस्वती भवन नावाची एक वास्तू आहे. त्यातील अनेक ग्रंथ मोडी लिपीत आहेत. मी मुख्यमंत्री असताना त्या वास्तूला भेट दिली. तेथून परत आल्यानंतर पाच लोकांची कमिटी बनवली आणि ती मोडी भाषेतील पुस्तकं मराठी भाषेत रुपांतरीत केली.

Sharad Pawar
Ajit Pawar Group News : शरद पवार गटातील एक बडा नेता अजितदादांसोबत जाणार; लवकरच मंत्रिपदाची शपथ घेणार...

राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ अशी दुसरी एक संस्था आहे. त्याचं देखील काम चांगलं आहे. उत्तम ग्रंथ संस्थेत आणण्यासाठी त्याचं काम सुरू असतं. नांदेड जिल्ह्यात सेलू नावाचे गाव आहे. तिथं असलेल्या कॉलेजमधील लेखनाची उंची पुण्यापेक्षा चांगली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांना एकच आवड होती, ती म्हणजे वाचन आणि ग्रंथ. ते जगात ज्या-ज्या देशांत गेले, त्यावेळी ते आपलं काम संपल्यानंतर तेथील ग्रंथालयात जाऊन ग्रंथ खरेदी करायचे. त्यांनी काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यात माझ्यावरही एक जबाबदारी सोपवली होती.

Sharad Pawar
Cabinet Expansion : राज्यात लवकरच आचारसंहिता; मग मंत्रिमंडळ विस्ताराचा काय फायदा; बच्चू कडूंची नाराजी कमी होईना

यशवंतराव चव्हाण एकटेच होते. आपल्यानंतर आपल्या घराची काय विल्हेवाट लावावी, हे त्यांनी लिहून ठेवले हेाते. देशाचे उपपंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बॅंक खात्यात केवळ ८६ हजार रूपये होते आणि त्यांच्या घरात ग्रंथांची संख्या २८ हजार होती. त्या घरात ग्रंथालय करावं, अशी त्यांची अपेक्षा होती. आम्ही लोकांनी त्यांच्या गावी कराड येथे ग्रंथालय उभे केले, अशी आठवण पवार यांनी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com