कितीही अफवा पसरावा; जनता रामदासभाईंच्या पाठीशी : ऑडीओ क्लिपप्रकरणी मुलाकडून पाठराखण

स्वतःच्या किरकोळ राजकीय अस्तित्वाचा अंत थोडा लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न आहे.
yogesh kadam
yogesh kadamSarkarnama
Published on
Updated on

खेड (जि. रत्नागिरी) : स्वतःच्या किरकोळ राजकीय अस्तित्वाचा अंत थोडा लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करणारे काही लोक बनावट ऑडीओ क्लिपद्वारे गरळ ओकत असले तरी शिवसैनिक आणि मायबाप जनता खंबीरपणे आपल्या मागे उभे आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी केले. (Yogesh Kadam's reply to allegations of former MLA Sanjay Kadam and Vaibhav Khedekar)

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील कागदपत्रे ही रामदास कदम यांनीच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप करत त्याबाबतच्या ऑडीओ क्लिप व्हायरल केल्या होत्या. त्याला आमदार योगेश कदम यांनी उत्तर दिले.

yogesh kadam
भाजपच्या नाराज गटाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा शब्द; तर फडणवीसांचा अध्यक्ष बदलाचा निरोप

खेड शहरातील सभापती निवास येथे शिवसैनिकांसोबत त्यांनी संवाद साधला. खेड सभापती निवास येथे कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते.आमदार कदम म्हणाले, स्वतःच्या किरकोळ राजकीय अस्तित्वाचा अंत थोडा लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करणारे काही लोक बनावट ऑडीओ क्लिपद्वारे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर टीका करत आहेत. परंतु शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणाऱ्या रामदास भाईंच्या मागे सर्व शिवसैनिक आणि जनता खंबीरपणे उभे आहेत. या लोकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी जनता त्यांचा कावेबाजपणा चांगलाच जाणते. जनतेला काही तरी बनावट दाखवायचे आणि सहानभूती मिळवायची हेच यांचे धंदे आहेत. पण आत्ता मात्र सर्व शिवसैनिक यांचे हे मनसुबे पूर्णपणे उधळून लावून काही प्रमाणात यांचे असलेले अस्तित्वही संपवतील, याची मला खात्री आहे.

yogesh kadam
तौफिक शेख यांचा व्हिडिओ खासदार ओवेसींकडे

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख विजय जाधव, अरुण कदम, शहरप्रमुख निकेतन पाटणे, माधवी बुटाला, सिद्धेश खेडेकर, पुनम जाधव, सुरेश शेठ, स्वप्निल सैतवडेकर, अमोल दळवी, राजेश बुटाला, पराग चिखले, दिलीप सावंत, परेश चिखले यांसह शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना व युवती सेना पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com