Mumbai News : काँग्रेसपासून लांब... लांब... असलेले आमदार झिशान सिद्दीकी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत येत असलेली जनसन्मान रॅलीसाठी सरसावलेले आहे.
याचवेळी झिशान यांना अजितदादांचा बदलेला लूक आणि गुलाबी रंग आवठल्याची चर्चा मुंबईत रंगली. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसतील, असे देखील सांगितले जाऊ लागले आहे. झिशान यांच्याकडून मात्र याबाबत कोणताच खुलासा समोर आलेला नाही.
अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान रॅली आज मुंबईत आहे. वांद्रे, कुर्ला इथं ही रॅली असणार आहे. यामुळे त्यांच्या आणि रॅलीच्या स्वागतासाठी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. यामुळे झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अजित पवार यांच्या जनसन्मान रॅलीसाठी झिशान सिद्दीकी यांनी केलेली तयारी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांना देखील खटकली असून, त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे. त्याचवेळी झिशान सिद्दीकी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु आता झिशान सिद्दीकी हे अजित पवार यांच्या जनसन्मान रॅलीत उघडपणे सहभागी झाल्याने चर्चेला अधिक पेव फुटले आहे.
बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस (Congress) सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी झिशान यांनी आपण काँग्रेसबरोबर असल्याचे सांगून काँग्रेस सोडून आपण कोठेही जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर त्यांचे पुत्र झिशान यांच्याकडे काँग्रेस देखील दुर्लक्ष केले. काँग्रेसकडून त्यांना बैठकीसाठी देखील डावलले जाऊ लागले. निरोप देखील दिले जात नव्हते. तसे झिशान यांनी ही नाराजी व्यक्त करून दाखवली होती.
विधान परिषद निडवणुकीच्यावेळी झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसकडून मिळालेल्या वागणुकीवर जाहीरपणे भाष्य करत नाराजी व्यक्त केली. मला कोणाचाही फोन, मेसेज, ईमेल नाही. काँग्रेसकडून बोलवले असते तर मी बैठकीला गेलो असतो. मला आमंत्रणच मिळत नव्हते. काँग्रेसकडून बैठकीबद्दल काहीही माहिती मिळत नव्हती, असे जाहीरपणे सांगून काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती.
याच निवडणुकीत काँग्रेसची सात ते आठ मतं फुटली होती. त्यावेळी देखील झिशान यांनी मी काँग्रेसचा आमदार आहे. काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. वरिष्ठ नेत्यांशी भेटून मी मतदान केले आहे आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारालाच मतदान केल्याचा दावा केला होता. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची फुटलेल्या मतांवरून झिशान सिद्दीकी यांनी महाराष्ट्र प्रदेशच्या नेत्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वरिष्ठ नेत्यांना आत्मचिंतनाचा सल्ला देखील दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.