Ahmednagar Madhi : मढी विश्वस्त हाणामारी प्रकरण : अध्यक्षांचे आमदार राजळेंकडे बोट, तर...

Kanifnath Temple, Madhi : पाथर्डीतील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात काही दिवसापूर्वी दोन गटात हाणामारी झाली. परंतु, आता विश्वस्त मंडळात फूट पडल्याचे समोर आले.
Kanifnath Temple, Madhi
Kanifnath Temple, Madhi Sarkarnama
Published on
Updated on

Monika Rajale : पाथर्डीतील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात काही दिवसापूर्वी वाद उफाळून दोन गटात हाणामारी झाली. परंतु, आता विश्वस्त मंडळात फूट पडल्याचे समोर आले. अध्यक्ष संजय मरकड यांनी या हाणामारीमागे आमदार मोनिका राजळे असल्याचा आरोप केला होता. परंतु अध्यक्षांना वगळून देवस्थानातील ११ पैकी इतर १० विश्वस्तांनी बैठक घेत अध्यक्षांनी मोनिका राजळेंवर लावलेले आरोपांचे खंडन केले. त्यामुळे अध्यक्ष संजय मरकड यांनी केलेल्या आरोपात ते एकटे पडले आहेत.

श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदाच्या निवडीवरून विश्वस्तांमध्ये धुसफूस सुरू होती. यासाठी विश्वस्तांच्या बैठकीत वाद उफळला आणि दोन गट पडून हाणामारी झाली. या वादाचे पडसाद नाथ भक्तांमध्ये उमटले आहेत. या हाणामारीत गंभीर जखमी झालेले अध्यक्ष संजय मरकड यांनी या हल्ल्यामागे भाजप आमदार मोनिका राजळे असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली.

Kanifnath Temple, Madhi
Rahul Gandhi : राहुल गांधींनी सांगितले संसदेतील घुसखोरीचे कारण... 

मोनिका राजळे (Monika rajale) यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला. या हल्ल्याचे कटकारस्थान त्यांच्याच घरी झाले. संजय मरकड यांच्या या आरोपामुळे या प्रकरणाला राजकीय वास येऊ लागला. परंतु, मोनिका राजळे यांच्यावर आरोप करणारे अध्यक्ष संजय मरकड यांना वगळून विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर विश्वस्तांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली.

श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या ट्रस्टच्या वादामध्ये आमदार मोनिका राजळे यांचा कोणताच प्रकाराचा संबंध नाही. त्यांना बदनाम करण्यासाठी राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप विश्वस्तांनी केला. परंतु, अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) यांनीच पूर्ण नियोजित कट कारस्थान करून वादाला सुरूवात केल्याचा आरोप विश्वस्तांनी या पत्रकार परिषदेत केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राधाकिसन मरकड, रवींद्र आरोळे, नवनाथ मरकड, शामराव मरकड, भगवान मरकड, भाऊसाहेब मरकड, जनार्दन मरकड, चंद्रभान पाखरे हे विश्वस्त पत्रकार परिषदेला उपस्थित होते. दरम्यान, या हाणामारीप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत.

राजकीय द्वेषातून दडपशाही

या हाणामारीत जखमी झालेले अध्यक्ष संजय मरकड यांची नगरमधील रुग्णालयात क्षितिज घुले, गोकुळ दौंड, संजय कोळगे यांनी भेट घेतली. पाथर्डी-शेवगावमध्ये कधी नव्हे इतके राजकीय द्वेषातून दडपशाही सुरू आहे. राज्यातील भटक्यांची पंढरी असलेल्या देवस्थानात असा राजकीय द्वेष धार्मिक संस्कृतीला शोभणारा नसल्याचे घुले यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

Kanifnath Temple, Madhi
Ahmednagar Madhi: मोठी बातमी! मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून तुंबळ हाणामारी; सात जण गंभीर जखमी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com