Nagar News : माजी पालकमंत्री शिंदे यांचा आक्रमकपणा; कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित

Ram Shinde सीना धरणाचे आवर्तन सोडण्यावरून पालकमंत्री विखे आणि माजी पालकमंत्री शिंदे यांच्यात पेटला होता संघर्ष
Radhakrishna Vikhe Patil, Ram Shinde
Radhakrishna Vikhe Patil, Ram Shindesarkarnama
Published on
Updated on

Nagar News : कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाचे सहसचिव डॉ. सुदिन गायकवाड यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढला. किरण देशमुख यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी यांच्या मागणीवर वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यास किरण देशमुख हे सक्षम ठरले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांनी शेतीसाठी सीना धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या मागणीवर कार्यवाही न झाल्याने नगर जिल्हाधिकारी कार्यालयात 12 फेब्रुवारीला यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीत माजी पालकमंत्री शिंदे हे आक्रमक झाले होते. कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याविरुद्ध निलंबनाची मागणी त्यांनी लावून धरली होती, परंतु कारवाई झाली नाही. यावरून त्यांनी नगर जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनामधील विसंगत कारभारावरून सत्ताधारी भाजप अंतर्गत कलह समोर आला.

सीना धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांनी केली होती. यासाठी ते नगर जिल्हा प्रशासनाविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाच त्यांनी या मुद्द्यावरून अप्रत्यक्षरीत्या घेरले होते. हेच का, "गतिमान सरकार", असा टोलादेखील राम शिंदे यांनी लगावला होता. यावरून खासदार सुजय विखे यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्टीकरण देत हा विषय भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil, Ram Shinde
Dapoli Nagar Panchayat : औट घटकेपुरतं मिळालेल्या नगराध्यक्षपदाचा दापोलीत प्रचंड फटाके वाजवून सोहळा साजरा!

जिल्हा प्रशासनाने कारवाईसाठी प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठवले असल्याचे सांगून जिल्हा प्रशासनाची बाजू लावून धरली. तसेच लोकप्रतिनिधीच्या समाजाेपयोगी मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा काय परिणाम होतो, हेदेखील प्रशासनाला कळेल, असा सूचक इशारा खासदार विखे यांनी या वेळी दिला होता. पालकमंत्री विखे यांनीदेखील या हलगर्जीपणाविरोधात कारवाईचे संकेत दिले होते. दरम्यान, आज कालवा समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हेदेखील दाखल झाले आहेत. बैठक सुरू होताच कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला. माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे आणि कर्जत-जामखेडमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध असलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. आमदार राम शिंदे हे अलीकडच्या काळात प्रशासनाविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते प्रशासनाला धारेवर धरत आहेत. यातून त्यांचा विखे पिता-पुत्र यांच्याविरुद्ध संघर्ष तीव्र होत आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Radhakrishna Vikhe Patil, Ram Shinde
Nagar News : महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित होणार; अध्यक्षांसह संचालकांचा राजीनामा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com