Babanrao Pachpute : माजी मंत्री पाचपुतेंवर पुतण्याची दुसऱ्यांदा मात; उपसरपंचपदही हिरावले

Shrigonda Political News : बहुमत असतानाही बबनराव पाचपुतेंना धक्का...
Babanrao Pachpute, Sajan Pachpute , shrigonda political news
Babanrao Pachpute, Sajan Pachpute , shrigonda political news Sarkarnama

Shrigonda Political News : श्रीगोंदा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या काष्टी येथे भाजपचे आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांचे बहुमत असतानाही पुतणे साजन पाचपुते यांनी राजकीय खेळी करत उपसरपंच पदासाठी राहुल टिमुणे हा आपला उमेदवार अवघ्या एका मताने निवडून आणत आमदार पाचपुते गटाला मोठा धक्का दिला आहे.

Babanrao Pachpute, Sajan Pachpute , shrigonda political news
Ajit Pawar News: महाविकास आघाडीत फूट? नार्वेकरांवरील अविश्वास ठरावावरुन अजित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले..

बहुचर्चित काष्टी ग्रामपंचायतीमध्ये आमदार पाचपुते गटाच्या अलका शांताराम राहिंज आणि साजन पाचपुते गटाचे राहुल प्रकाश टिमुणे यांच्यात उपसरपंच पदासाठी लढत झाली. साजन पाचपुते यांच्याकडे सरपंचासह आठ सदस्यांचे बळ होते तर आमदार पाचपुते गटाकडे सतरापैकी दहा सदस्यांचे स्पष्ट बहुमत होते.

Babanrao Pachpute, Sajan Pachpute , shrigonda political news
Pandharpur Urban Bank Election : भाजपच्या प्रशांत परिचारकांनी केला मनसे नेत्याचा करेक्ट कार्यक्रम...

परंतु, आमदार पाचपुते गटाचा एक सदस्य फुटल्याने दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी नऊ मते पडली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने सरपंच साजन पाचपुते यांनी आपल्या एका मताचा विशेषाधिकार वापरीत निर्णायक मतदान टिमुणे यांना केल्याने राहुल टिमुणे एक मताने विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com