किरीट सोमय्या गुरूवारी नगर जिल्ह्यात : पारनेर कारखान्यावरून राजकारण तापण्याची शक्यता

पारनेर ( Parner ) कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड ( Dr. Bhagwat Karad ) व ईडीचे ( ED ) मुख्य संचालक संजय मिश्रा ( Sanjay Mishra ) यांची दिल्ली येथे भेट घेऊन ही मागणी केली आहे.
parner sugar factory
parner sugar factorysarkarnama

पारनेर : पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) केली आहे. पारनेर ( Parner ) कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड ( Dr. Bhagwat Karad ) व ईडीचे ( ED ) मुख्य संचालक संजय मिश्रा ( Sanjay Mishra ) यांची दिल्ली येथे भेट घेऊन ही मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सोमय्या गुरूवारी ( अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यात ते पारनेर, कर्जत व जामखेड येथे भेटी देणार आहेत.

पारनेर कारखाना बचाव समितीने कारखाना विक्रीनंतर लगेचच यातील गैरव्यवहाराची तक्रार केली होती. क्रांती शुगरकडे पैसे नसतानाही 32 कोटी रूपयांना हा कारखाना कसा विकत घेतला. तसेच राज्य सहकारी बँकेने कारखाना विक्रीची बोगस प्रक्रीया राबविला असल्याचा अक्षेप बचाव समितीने घेतला आहे. या कारखाना विक्रीतील भ्रष्टाचार बाबत औरंगाबाद खंडपीठात तीन याचिका दाखल आहेत. या बाबत समितीने पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे.

दिल्ली येथे बचाव समितीने समाजसेवक माणिक जाधव व भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेतली. त्या वेळी सोमय्या यांनी कारखाण्याचे सभासद व शेतकरी यांच्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहे असे अश्वासन दिले होते. त्या नुसार सोमय्या हे गुरूवारी (ता. 23) पारनेरला येत आहेत. प्रथम कारखाना स्थळावर सभासद व शेतकरी यांच्याशी त्या नंतर ते पारनेर येथे येणार असून तेथे तीन वाजता पत्रकार परीषदही घेणार आहेत.

parner sugar factory
...म्हणून किरीट सोमय्या गल्लीत गोंधळ घालत आहेत!

उपोषणाचा इशारा

पारनेर कारखाना खरेदीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच दिले होते. बचाव समितीने सर्व पुरावे देऊन ईडी कडे पाठपुरावाही केला होता. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे ईडी च्या विरोधात मुंबई येथे 20 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही बचाव समितीने दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com