Kirna Lahamate Enters NCP
Kirna Lahamate Enters NCP

भाजपकडून उमेदवारीची आशा संपल्यावर डाॅ. किरण लहामटे अखेर राष्ट्रवादीत दाखल

भारतीय जनता पक्षातून अकोले विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार नसल्याचे निश्चित झाल्यानंतर डाॅ. किरण लहामटे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोले येथे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Published on

अकोले (नगर) : भारतीय जनता पक्षातून अकोले विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार नसल्याचे निश्चित झाल्यानंतर डाॅ. किरण लहामटे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोले येथे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

अकोले येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. यासाठी सकाळी दहा वाजता पवार यांचे कळस येथे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर ोटारसायकल रॅलीने अकोले शहरातील महात्मा फुले चौकात त्यांचे ढोल ताश्याच्या गजरात स्वागत झाले. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, घनश्याम शेलार, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दशरथ सावंत आदी उपस्थित होते. मेळाव्यात डाॅ. लहामटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी सुनिता भांगरे, युवा नेते अमित भांगरे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com