अयोध्येत राममंदिर होणार : श्री श्री रविशंकर

''आजपर्य़ंत मी जी कामे हाती घेतली, त्याला यश मिळाले आहे. अयोध्या येथे राममंदिर होण्याच्या कामातही यश येईल. दोन्ही समुदायाच्या संगनमतानेच त्या जागेवर राममंदिर होईल,'' असा विश्वास आर्ट आॅफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी येथे व्यक्त केला.
अयोध्येत राममंदिर होणार : श्री श्री रविशंकर
Published on
Updated on

नगर : ''आजपर्य़ंत मी जी कामे हाती घेतली, त्याला यश मिळाले आहे. अयोध्या येथे राममंदिर होण्याच्या कामातही यश येईल. दोन्ही समुदायाच्या संगनमतानेच त्या जागेवर राममंदिर होईल,'' असा विश्वास आर्ट आॅफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी येथे व्यक्त केला.

नगरमध्ये आज ध्यान मंदिराचे उदघाटन व सत्संग कार्यक्रम झाला. या वेळी उपस्थितांना प्रबोधित करताना त्यांनी ध्यानधारणेचे महत्त्व विषद केले. प्रश्नोत्तराच्या वेळी लोकांनी राममंदिराबाबत यश येईल का, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना श्री श्री रविशंकर म्हणाले, ''मला माहिती आहे, तेथे मंदिर बनणार आहे. त्यासाठी दोन्ही समुदायांची संमतीही मिळणार आहे. मागील काही वर्षांपूर्वी मी दोन्ही समुदायांना एकत्र करून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. मध्यंतरी शंकराचार्यांनी याप्रश्नी पुढाकार घेतला होता. आता संबंधित दोन्ही जनसमुदायाचे धर्मगुरू व संबंधित लोक माझ्याकडे आले होते. त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. त्या परिसरातील पाच एकर जमीन मशिदीसाठी द्यावी व रामजन्मभूमीची एक एकर जमीन राममंदिरासाठी द्यावी, असा प्रस्ताव ठेवला होता. याबाबत दोन्ही जनसमुदायातील धर्मगुरूंनी मान्य केले होते. आगामी काळातही याला यश येऊन तेथे मंदिर होईल," 

''न्यायालयाकडून हा वाद मिटण्यास वेळ लागू शकेल. मात्र, दोन्ही जनसमुदायाचे मन जोडण्याचे काम न्यायालयाकडून होणार नाही. त्यासाठी दोन्हीही जनसमुदायांनी संगनमताने निर्णय घेण्याची गरज आहे. दोन्ही जनसमुदायांना शांतता हवी आहे. परंतू, काही लोक शांतता भंग करतात, असे असले तरी तेथे मंदिर नक्कीच होणार आहे." असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

नगरचे काैतुक
नगर शहराविषयी एका प्रश्नाला उत्तर देताना श्री श्री रविशंकर म्हणाले, ''नगरची प्रगती चांगली झाली आहे. रस्तेही मोठे झाले आहेत. नगरला ध्यान मंदिर होत आहे, ही गाैरवाची बाब आहे. तेथे आलेला प्रत्येकजण आनंदी होऊन जाईल. येथील आर्ट आॅफ लिव्हिंगचे साधक चांगले काम करीत आहेत. त्यांचा अनेक वर्षांपासूनचा नगरला येण्याचा आग्रह होता. आता नगरच्या लोकांना आनंदी जीवन बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. हे शहर गुन्हेमुक्त होण्यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी. सर्वांच्या प्रयत्नाने प्रेम आणि आनंदाच्या लहरी या शहरात उठतील, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. आता गुढी पाडवा दोन दिवसांवर आला आहे. सर्वांनी आपला परिसर आदर्श बनविण्याचा यानिमित्ताने संकल्प करावा.'' 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com