अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. अनेकांना कोरोनाचे पहिला व दुसरा डोस मिळाल्याने कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय कमी निर्माण झाली आहे. कोरोनाचे डोस घेतले म्हणजे कोरोना होणार नाही असे मात्र नाही. कोरोना डोस घेतल्यावरही सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. MLA Kale said, I will resume my service
राज्य सरकारने नुकतेच शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची नावे जाहीर केली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांना अध्यक्षपद मिळाले. या निमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या भोवती सत्कारासाठी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने पुरेशी काळजी घेतली होती. मात्र तरीही आमदार काळे आज कोरोना बाधित आढळून आले.
ही माहिती मिळताच आमदार काळे यांनी स्वतः या बाबत कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. त्यामुळे कार्यकर्ते व चाहत्यांत चिंतेचे वातावरण होते. काही चाहत्यांनी सदिच्छा संदेशही सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
आमदार काळे यांनी आज पुन्हा ट्विट करून कार्यकर्ते व नागरिकांना त्यांच्या तब्येतीची माहिती दिली. ट्विटमध्ये म्हटले आहे की, श्री साईबाबा व आपल्या सर्वांच्या प्रेम व आशीर्वादाने माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहेत. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी चिंता करू नये. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईन, अशी ग्वाहीही आमदार काळे यांनी दिली आहे.
शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठले
न्यायालयाची परवानगी न घेता शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारने जाहीर केल्याचा आरोप ठेवत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू आहे. यात आज औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी संस्थानचे नवनियुक्त विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठविण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी चार दिवसांनी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.