आमदार नीलेश लंके म्हणाले, कर्जत-जामखेडची जनता भाग्यवान

आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त कोंभळी (ता. कर्जत) येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
nilesh lanke
nilesh lankeAshish Nimbore
Published on
Updated on

मिरजगाव : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांची नुकतीच मुंबईत भेट झाली होती. या भेटीचे फोटो आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर टाकले होते. या भेटीची राज्यभर चर्चा झाली होती.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोंभळी (ता. कर्जत) येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, समाज कल्याण समिती सभापती उमेश परहर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, अमृत लिंगडे, वसंत अनभुले, प्रवीण तापकीर, संदीप गांगर्डे, संजय अनभुले, डॉ. सुनील मुळे, दीपक ननवरे, रवींद्र महारनवर, सचिन दरेकर, महेश काळे, अमोल थेटे, सागर गंगावणे आदी उपस्थित होते.

nilesh lanke
आमदार रोहित पवार यांनी आपल्याच सरकारचे टोचले कान

या प्रसंगी आमदार लंके म्हणाले, आमदार रोहित पवार यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व लाभल्यामुळे कर्जत जामखेडची जनता भाग्यवान आहे. रक्तदान शिबिर आयोजनाचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून सर्वांनी रक्तदान केले पाहिजे.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून या मतदार संघातील लोकांना एक अभ्यासू, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारे सर्व गुणसंपन्न नेतृत्व मिळाले आहे. यामुळे येथील जनता भाग्यवान आहे. पवार यांना देखील खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी लाभले आहेत. येथील स्थानिक कार्यकर्त्यांची मोलाची साथ आमदारांना मिळत आहे, असेही आमदार लंके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com