नामदेव राऊत यांच्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा

राम शिंदे ( Ram Shinde ) बरोबर दिसलेल्या नामदेव राऊत ( Namdev Raut ) यांनी दुसऱ्या दिवशी अचानक भाजपला ( bjp ) अखेरचा रामराम केल्याची घोषणा केली होती.
Namdev Raut joined the NCP
Namdev Raut joined the NCPsarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : कर्जत येथे भाजप युवा मोर्चा व ओबीसी सेलच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या समवेत कर्जतमधील नगरपरिषदेचे पहिले अध्यक्ष नामदेव राऊतही होते. मात्र याच कार्यक्रमाच्या दिवशी राम शिंदे बरोबर दिसलेल्या नामदेव राऊत यांनी दुसऱ्या दिवशी अचानक भाजपला अखेरचा रामराम केल्याची घोषणा केली होती.

Namdev Raut joined the NCP
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात गुप्तभेट; राजकीय वर्तुळात खळबळ   

नामदेव राऊत यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. तसेच आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. कर्जत नगरपरिषदेची लवकरच निवडणूक आहे. त्यादृष्टीने कर्जतमधील राजकीय हलचालींना वेग आला आहे.

भाजपचे कर्जतमधील नेते आणि विद्यमान उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेविका हर्षदा अमृत काळदाते, उषा अक्षय राऊत, किरण पाटील, सतीश समुद्र, भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामदास हजारे, किरण पाटील आणि रवी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यांच्यासह अमृत काळदाते, भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस इरफान सय्यद, भाजपचे माजी शहराध्यक्ष रामदास हजारे, बाजार समितीचे संचालक बजरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते इन्नूस पठाण, दीपक ननवरे, अरबाज पठाण, साहिल कुरेशी अलिम कुरेशी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोणत्याही अपेक्षेशिवाय लोकहितासाठी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या या नेत्यांचं स्वागत करुन अजित पवार यांनी त्यांच्याशी संवादही साधला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची कर्जतमधील ताकद वाढण्यासही निश्चितच मदत होणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Namdev Raut joined the NCP
आमदार रोहित पवार यांना आला पोलिसांचा असा अनुभव

यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, सुभाष गुळवे, नितीन धांडे, प्रसाद ढोकरीकर, बापूसाहेब नेटके, भास्कर भैलुमे, अभय बोरा, रज्जाक झारेकरी, दीपक शिंदे, लालासाहेब शेळके आणि नितीन तोरडमल आदी स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्या प्रमाणे भाजपच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे कर्जत नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. राऊत यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील कोणती मोठी राजकीय खेळी करतात यावर सध्या राजकीय चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com