केडगाव प्रकरणाच्या भीतीमुळेच संग्राम जगतापांचा भाजपप्रवेश!

नगर विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित आहे.
केडगाव प्रकरणाच्या भीतीमुळेच संग्राम जगतापांचा भाजपप्रवेश!
Published on
Updated on

नगर : राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप पक्षाला रामराम करून येत्या दोन दिवसांत भाजपवासी होणार आहेत. त्यामुळे नगर विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित आहे. 

त्याच प्रमाणे लोकसभेला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना मदत केलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे काय, असा प्रश्न नगर शहरात उपस्थित झाला आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्यात यापूर्वी लढत झाली. त्यामध्ये जगताप यांनी बाजी मारली. या काळात महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे होती. त्यामुळे आमदार असूनही जगताप यांनी शहरातील प्रश्नावर विविध आंदोलने करून शिवसेनेस जेरीस आणले होते. याच दरम्यान केडगाव येथील हत्याकांड प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जगताप यांच्यावर आरोप होऊन त्यांना कारागृहात  पाठवले गेले. या पार्श्वभूमीवर जगताप विरुद्ध शिवसेना असेच चित्र पाहण्यास मिळाले. या प्रकरणात आमदार जगताप अनेकदा अडचणीत आले. यापुढेही हे प्रकरण पुन्हा डोके वर काढील आणि जगताप यांना पुन्हा अडचण निर्माण होईल, या भीतीपोटीच आमदार जगताप भाजपमध्ये गेले असल्याचे बोलले जाते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमदनगर मतदार संघातून आमदार जगताप यांनी डॉ. सुजय विखे पाटील  यांच्या विरोधात लढत दिली. या लढतीत डॉ. विखे मोठ्या फरकाने निवडून आले. जगताप यांना पराभवाचा झटका बसला असला, तरी आता ते विधानसभेसाठी दंड थोपटून उभे राहिले. या दरम्यानच्या काळात खासदार विखे यांनी नगर जिल्ह्यात सर्वच्या सर्व आमदार भाजपचे असतील, अशी घोषणा केली. नगरमधून आमदार जगताप यांना वातावरण सकारात्मक होते. असे असतानाही त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामागे अनेक कारणे असतीलही ; परंतु निवडून येण्याची खात्री आणि भाजपची आगामी काळात होणारी मदत, हे या निर्णयाला कारणीभूत ठरू शकेल.

दरम्यान, शिवसेनेकडून उपनेते अनिल राठोड यांनीही विधानसभेची जोरदार तयारी केली आहे. भाजप-शिवसेना युतीमध्ये राठोड यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. त्यामुळे त्यांनी लोकसभेत विखे यांचे काम जोरदारपणे केले. शहरातील गल्लीबोळांमध्ये फिरून भाजपच्या उमेदवारास विजयाचे साकडे घातले. आज मात्र परिस्थिती बदलली. भाजपने आमदार जगताप यांना पक्षात स्वीकारल्याने त्यांना विधानसभेचा शब्द देणे सहाजिकच आहे. या सर्व पार्श्वभूमी अनिल राठोड यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी काळात शिवसेना व भाजप यांच्यामध्ये युती होणार नसेल असेच संकेत यानिमित्ताने मिळत आहेत. भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास शिवसेनेच्यावतीने राठोड उमेदवारी करतील, यात शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com