सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना लागले वेध निवडणुकीचे

राज्य सरकारने ( State Government ) कोरोना ( Corona ) काळात सहकारी संस्थांच्या निवडणुका ( Elections ) पुढे ढकलल्या होत्या.
Ahmednagar Primary Teachers Bank
Ahmednagar Primary Teachers BankSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे. बॅंकेची निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा सत्ताधारी मंडळासह विरोधकांमधून केली जात आहे. निवडणुकीची तारीख कधी जाहीर होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जनजीवनावर परिणाम झालेला आहे.

Ahmednagar Primary Teachers Bank
जिल्हा बँक संचालकांच्या निवडणुकीसाठी अर्जांचे अर्धशतक

सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात दिसून येत आहे. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झालेले होते. त्यामुळे राज्य सरकारने कोरोना काळात सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे बॅंका, पतसंस्था व सोसायट्यांवर असलेल्या संचालक मंडळाला मुदत वाढ मिळाली होती. या मुदतवाढीचा अनेकांना फायदा झालेला आहे. त्यामध्ये अनेकांना अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याची संधीही मिळाली आहे. यामध्ये सत्ताधारी व विरोधकांना काही फायदा तर काही तोटा झालेला आहे. त्यामुळे सर्वच सहकारी संस्थांमधून आता निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

जिल्हा प्राथमिक बॅंकेची मुदत संपून अनेक महिने लोटलेले आहे. बॅंकेची निवडणूक लागणार असल्यामुळे अनेकांनी मागील वर्षीच मतदारांशी संपर्क सुरु केला होता. मात्र कोरोनाने निवडणूक पुढे ढकल्याने त्यांचा अद्यापही संपर्क सुरु आहे. बॅंकेची निवडणूक घेण्यात यावी, यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आलेले असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची निवडणूक घ्यावी, यासाठी सत्ताधारी मंडळासह आता विरोधकांमधून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्राथमिक बॅंकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही बॅंकेची निवडणूक घेण्यात यावी, असा ठरावही करण्यात आलेला आहे.

जिल्हा प्राथमिक बॅंकेची निवडणूक व्हावी, यासाठी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. न्यायालयाच्या निकालाची आम्हाला प्रतीक्षा आहे.

- प्रविण ठुबे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद.

कोरोनामुळे संचालक मंडळाला मुदत वाढ मिळालेली आहे. आम्ही सभेत निवडणूक व्हावी, म्हणून ठराव केलेला आहे. सभासद हिताचे कामकाज संचालक मंडळाने केलेले आहे. त्यामुळे निवडणूक कधी लागली तरी आम्ही तिला सामोरे जायला तयार आहे.

- बापूसाहेब तांबे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ

शिक्षक बॅंक मोठी आर्थिक संस्था आहे. सर्वसामान्य शिक्षकांच्या बळावर ती नावारुपाला आली आहे. ठरलेल्या मुदतीत निवडणुका होणे सभासद व संस्थेच्या दृष्टीने हिताचे असते. त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका व्हाव्यात. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नावारुपाला आलेल्या कर्तत्वान व्यक्तीच्या हाती सत्ता येईल.

- सूदर्शन शिंदे, अध्यक्ष, गुरुकुल मंडळ

सभासदांच्या हितासाठी ठरलेल्या मुदतीत निवडणूक होणे गरजेचे होते. मात्र कोरोनाने अडथळा आला. आता निवडणुका घेणे शक्य आहे. त्यामुळे सहकार खात्याने तातडीने बॅंकेची निवडणूक जाहीर करणे अपेक्षीत आहे.

- राजेंद्र निमसे, राज्य संघटक, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com