राज्यपालाचा दौरा उठला २०० जनावराच्या जिवावर, आधिव्याख्यातांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार...

ह्या प्रकारचा निषेध गौप्रेमींनी केला असून जनावरांना उपाशी ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ प्रशासनाने पशुवैद्यकीय महाविद्यालयाशी समन्वय साधणे आवश्यक असताना त्यांना केवळ गृहीत धरून दुर्लक्षित केले.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

परभणी : राज्यपालांचा दौरा असला की, तगडा बंदोबस्त लावला जातो. त्या परिसरात येणाऱ्यांना ओळखपत्रे दिली जातात आणि कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची सर्व काळजी प्रशासनाकडून घेतली जाते. येवढेच काय पण राज्यपालांच्या ताफ्याला एखादे जनावरही आडवे येऊ नये, ही पण खबरदारी घेतली जाते. Care is also taken not to let any animal to cross governor's Convey. पण ही व्यवस्था जनावरांच्या जिवावर उठली तर निश्‍चितच समाजमन हळहळणार.. नेमका हाच प्रकार येथे घडला आहे. 

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परिसरात असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चाऱ्याअभावी येथे असलेल्या दोनशे जनावरांची उपासमार होत असल्याची तक्रार या विद्यालयाच्या अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 6 व 7ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दोऱ्यावर आहेत. त्यांचे सर्व कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून या परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात असले तरी विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मात्र ओळखपत्र देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना परिसरात येण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. परिणामी पशुवैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या 200 जनावरांना शुक्रवारी चारा मिळाला नाही, तर शनिवारी राज्यपालांचा दौरा असल्यामुळे चारा मिळण्याची शक्यताही नाही. शिवाय दररोज या पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसरातील 200 पेक्षा जास्त जनावरे उपचारासाठी येतात, त्यांनाही प्रतिबंध करण्यात आल्याने त्यांचीही गैरसोय झाली आहे. 

या अनुषंगाने या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी कृषी विद्यापीठांनी पशुवैद्यकीय महाविद्यालयास दुर्लक्षित केले व पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या 100 कर्मचाऱ्यांना प्रतिबंध करत 200 जनावरांना चारा मिळाला नसल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. डॉ  नितीन मार्कंडेय यांच्याशी संपर्क साधला असता, त्याच्या वर कृषी विद्यापीठ प्रशासनाने प्रचंड दबाव टाकला असून या विषयावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

गौप्रेमींनी केला निषेध..
ह्या प्रकारचा निषेध गौप्रेमींनी केला असून जनावरांना उपाशी ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ प्रशासनाने पशुवैद्यकीय महाविद्यालयाशी समन्वय साधणे आवश्यक असताना त्यांना केवळ गृहीत धरून दुर्लक्षित केले. त्यामुळे दोनशे जनावरांची उपासमार झाली. आता जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, ह्याकडे गौप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com