अमरावतीत दिनेश बुब स्वगृही शिवसेनेत दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटीवर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले नगरसेवक दिनेश बुब यांनी आज अचानक शिवसेनेत प्रवेश केला.
अमरावतीत दिनेश बुब स्वगृही शिवसेनेत दाखल

अमरावती : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटीवर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले नगरसेवक दिनेश बुब यांनी आज अचानक शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीने येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांना पाठींबा दिल्याने बुब यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आता भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसुळ यांना बळ मिळाले आहे.

विशेष म्हणजे बुब आधी शिवसेनेचे महानगर प्रमुख होते. सुरुवातीला ते विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुखही होते. नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. तीत त्यांना पराभव पत्करावा लागला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते
दर्यापूर विधानसभा मतदारसंघात दावा करु शकतात. तेथे जर अभिजीत अडसुळांना दावा केला तर बडनेरा मतदारसंघातून ते पक्षाकडे तिकीट मागण्याची शक्‍यता आहे. त्यासाठीच त्यांनी घरवापसी केली असल्याचे बोलले जात आहे. प्रचाराची
रणधुमाळी सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला ते स्वगृही परतल्यामुळे आनंदरावांचे हात बळकट झाल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com