बाळासाहेबांच्या भूमिकेवर मतदारसंघाचे गणित ठरणार 

बाळासाहेबांच्या भूमिकेवर मतदारसंघाचे गणित ठरणार 

बुलडाणा : पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या सोबत दोन पंचवार्षिक लढा देणारे बाळासाहेब उर्फ प्रसेनजीत पाटील यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तथापि, कॉग्रेसची उमेदवारी डॉ. स्वाती संदीप वाकेकर व कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांची भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीनंतर आज (ता.2) भूमिका स्पष्ट करणार आहे.

घाटा खालील राजकारण हा जिल्ह्यातील राजकारणाचा एक अभिभाज्य घटक समजला जातो. त्यातही जळगाव जामोद मतदार संघाला विशेष महत्त्व आहे. मतदार संघ सध्या भाजपचा गड झाला आहे तो भेदण्यासाठी कॉग्रेसने विडा उचलला आहे.  दरम्यान, मतदार संघातील निवडणुकीत जातीय समिकरणावर सर्व नियोजन करण्यात येते. 

त्यानुसारच मतदार संघात डॉ. संजय कुटे यांचा विकास पर्व थांबविण्यासाठी कॉग्रेसकडून माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या सुपुत्रि डॉ. स्वाती वाकेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, दोनवेळा विजयला हूलकावणी बसलेले तत्कालीन भारिप बहुजन उमेदवार बाळासाहेब उर्फ प्रसेनजित पाटील यांनी कॉग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर फेसबुक या सोशल मीडियावर त्यांची भूमिका मांडण्याचे जाहीर केल्यामुळे येथील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. 

ते आज (ता.2) महात्मा गांधी जयंती मुहूर्तावर संध्याकाळी  जिंनिग प्रेसिंगमध्ये बोलणार आहे. त्यांच्या या भूमिकेसाठी समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. महात्मा गांधी जयंती दिनी प्रसेनजित पाटील इतर पक्षाचा झेंडा घेत कॉग्रेसला सोडचिट्ठी देतात की शांत राहत पक्षकार्य करतात याकडे मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर, कॉग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली की त्यांनी कॉग्रेस उमेदवारी नाकारली हे कोडे असून त्याचाही उलगडा होणार
आज होईल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com