नागपूरचे हिवाळी  अधिवेशन गुंडाळण्याची घाई का? : विखे पाटील 

vikhe---Bapat
vikhe---Bapat

नागपूर  :विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर अद्याप चर्चा बाकी असताना आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यानंतरही सरकार नागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का करत आहे, असा प्रश्‍न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत 22 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाचा समारोप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, "नागपूर अधिवेशनाचा कालावधी एका आठवड्याने वाढवण्यात यावा, अशी मागणी आम्ही 21 नोव्हेंबरला केली होती. हे अधिवेशन विदर्भात होत असल्याने येथील जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न या अधिवेशनात चर्चिले जाणे अपेक्षित आहे. "

"परंतु, हे अधिवेशन दोन आठवड्यातच संपवले जाणार असल्याने विदर्भातील जनतेसह संपूर्ण राज्यातील अनेक समाजघटकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होईल,"असेही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.

नागपूरात  पावसाळी अधिवेशन घेण्याचा विचार  :बापट

 "नागपूरातील हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नावर चर्चेला पुरेसा वेळ मिळत नसल्याने या शहरात हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन घेण्याचा विचार सरकारचा आहे. यासाठी सर्वांना विश्वासात घेवूनच निर्णय घेण्यात येणार आहे", अशी माहिती संसदिय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

"सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप 22 डिसेंबरला वाजणार आहे. त्याचा कालावधी वाढविण्यात आला नाही. या अधिवेशनात विरोधकांनी सहकार्य केले नाही. कामकाजात भाग न घेता अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विरोधकांची मागणी हास्यास्पद आहे," असेही बापट म्हणाले.

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये होईल, त्यावेळी नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यावर निर्णय केला जाणार असल्याचे बापट म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com