भंडाऱ्यात शिवसेना लोकसभेसाठी आग्रही

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेने युतीची घोषणा केली. या घोषणेनंतर जिल्ह्यातील शिवसेना-भाजपत बेबनाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपने सावध भूमिका घेतली असली तर येणाऱ्या काळात दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी उडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
 भंडाऱ्यात  शिवसेना लोकसभेसाठी आग्रही

भंडारा  : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेने युतीची घोषणा केली. या घोषणेनंतर जिल्ह्यातील शिवसेना-भाजपत बेबनाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे.

शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपने सावध भूमिका घेतली असली तर येणाऱ्या काळात दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी उडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्र येत आघाडीची मोट बांधत आहेत. आघाडीमुळे लोकसभेसह विधानसभा निवडणूक कठीण असल्याचे लक्षात घेता ताणलेले संबंध दूर सारून भाजप-शिवसेनेने युती केली. मात्र, या युतीमुळे जिल्ह्यातील दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीच्या युतीच्या 'फाॅर्म्युला'नुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ भाजपच्या कोट्यात आहे.

जिल्ह्यातील तीनपैकी भंडारा विधानसभा लोकसभा शिवसेना व तुमसर आणि साकोली विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होते. मात्र, मागील निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणुका लढवून भाजपने तिन्ही विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविल्याने भंडारा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची आशा धूसर झाली आहे.

भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्राबल्य कमकुवत असल्याने शिवसेना लोकसभाक्षेत्रापासूनही मुकणार आहे. यामुळेच जिल्हाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत लोकसभेसाठी आग्रह धरला आहे. मात्र, भाजपच्या वाट्याला लोकसभा मतदारसंघ जाणार असल्याने सावधगिरी घेत 'वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला असताना भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करून शिवसेनेचे पंख छाटले होते. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कुटता निर्माण झाली आहे. युतीचा निर्णय झाला असला तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मने जुळणार की काय? हे येणारा काळच सांगेल.

येत्या काळात दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी उडाल्यास विरोधकांचा याचा फायदा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे यावर पक्षश्रेष्ठींना मध्यस्थी करावी लागणार आहे, हे तेवढेच खरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com