नगराध्यक्ष ते थेट खासदार... सुनील मेंढेंचा राजकीय प्रवास

नगराध्यक्ष ते थेट खासदार... सुनील मेंढेंचा राजकीय प्रवास

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय राजकारणात पाऊल टाकत संसद गाठली आहे. नगराध्यक्ष ते थेट खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. मागील अडीच वर्षांपासून भंडारा नगर परिषदेचे अध्यक्षपद सांभाळत असलेले सुनील मेंढे यांना राजकारणाचा पाहिजे तेवढे अनुभव नाही. तरीही, त्यांनी या निवडणुकीत मातब्बर नेते, माजी शिक्षण राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांचा दारुण पराभव केला.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुनील यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर बांधकाम व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले. शिकत असतानापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आदी संघटनांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर राहत होते. भाजपचे माजी आमदार राम आस्वले यांच्या मार्गदर्शनात बांधकाम व्यवसायाचा त्यांनी अनुभव घेतला. आस्वलेंसोबत असताना त्यांनी राजकीय धडे गिरविले होते. यानंतर भाजपमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून मेंढे
कुटुंबीयांची ओळख आहे. 2015 मध्ये भाजपने त्यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून पहिल्यांदा नियुक्ती करून त्यांच्यावर पक्षसंघटनेची जबाबदारी दिली. फेब्रुवारी 2017 च्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

कोणताही राजकीय वारसा नसतांनाही त्यांनी राजकारणात सर्वप्रथम नगर परिषद निवडणुकीत भाग्य आजमावले आणि यशस्वी झाले. अडीच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी खासदारकीची माळ गळ्यात पाडून घेतली. नवखे असताना त्यांनी विजयश्री खेचून आणली. या मतदारसंघातील प्रलंबित समस्यांवर केंद्रियमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com