tukaram mundhe 1
tukaram mundhe 1

तुकाराम मुंढेंनी मशीद परिसर केला सील!

अत्यावश्‍यक सेवा देणारे शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी, आवश्‍यक तातडीची सेवा तसेच अंत्यविधी, डॉक्‍टर, नर्स, औषध विक्री दुकानदार, पॅथॉलॉजीस्ट, रुग्णवाहिका आदी तसेच पोलिस विभागातर्फे पासधारक असलेल्या जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती वगळता इतर नागरिकांना बाहेर येण्या-जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलाआहे.

नागपूर : कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतरंजीपुरा झोनमधील बडी मशीद परिसर महापालिकेने सील केला. या परिसरातून कुणालाही बाहेर जाता येणार नाही तसेच या परिसरात प्रवेशावरही प्रतिबंध लावण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील सतरंजीपुरा झोनमधील बडी मशीद परिसरातील रहिवासी नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासंबंधी खबरदारी म्हणून सतरंजीपुरा भागाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आयुक्तांनी तत्काळ सतरंजीपुरा झोनमधील बडी मशीद परिसरातील सर्व सीमा बंद करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार बडी मशीद, सतरंजीपुरा प्रभाग 21 या भागातील निश्‍चित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील उत्तर-पूर्वेस शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, दक्षिण-पूर्वेस रचना कॉम्प्लेक्‍स, दक्षिण-पश्‍चिमेस जुना मोटार स्टॅंड चौक, उत्तर-पश्‍चिमेस मारवाडी चौक टी-पॉइंट असून या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

अत्यावश्‍यक सेवा देणारे शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी, आवश्‍यक तातडीची सेवा तसेच अंत्यविधी, डॉक्‍टर, नर्स, औषध विक्री दुकानदार, पॅथॉलॉजीस्ट, रुग्णवाहिका आदी तसेच पोलिस विभागातर्फे पासधारक असलेल्या जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती वगळता इतर नागरिकांना बाहेर येण्या-जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःसह कुटुंबीयांची काळजी घ्यावी. कुणीही आवश्‍यकतेशिवाय घराबाहेर पडू नये. नियमित स्वच्छता राखावी. आवश्‍यक मदतीसाठी मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com