विनोद तावडे यांनी `पोरकटपणा' थांबवावा; आमदार वजाहत मिर्झा यांची मागणी 

अमरावती येथे विद्यार्थ्यांना अटक करण्याचे निर्देश देणाऱ्या शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा व पोरकटपणा थांबवावा, अशी मागणी यवतमाळ जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष व आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी केली आहे.
विनोद तावडे यांनी `पोरकटपणा' थांबवावा; आमदार वजाहत मिर्झा यांची मागणी 

यवतमाळ : अमरावती येथे विद्यार्थ्यांना अटक करण्याचे निर्देश देणाऱ्या शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा व पोरकटपणा थांबवावा, अशी मागणी यवतमाळ जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष व आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी केली आहे. 

काही दिवसांपूर्वी अमरावती येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अडचणीचे प्रश्‍न विचारल्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना अटक करावी, असे निर्देश पोलिसांना दिले होते. त्याचप्रमाणे त्यांचे मोबाईल जप्त करण्याचे आदेशही दिले होते. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यानेच विद्यार्थ्यांच्या अटकेचे आदेश द्यावे, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून शालेय मंत्री पोरकटपणा करीत असल्याची टीका कॉंग्रेसचे आमदार वजाहत मिर्झा यांनी केली आहे. 

सरकार व शिक्षण खाते सातत्याने शिक्षणासाठी चांगले वातावरण निर्माण करण्याऐवजी यात अडथळे निर्माण करीत आहे. आता शालेय शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांना अटकेचे आदेश देत असतील तर विद्यार्थ्यांनी कुणाकडे दाद मागावी, असा सवाल आमदार मिर्झा यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com