नागपुरात विकास ठाकरे विरोधक पॉवरफुल 

विकास ठाकरे यांना कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून हटविण्यात यावे अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांनी केली. आमदार तसेच कॉंग्रसचे निरीक्षक नसिम खान यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण शहराध्यक्ष विकास ठाकरेंच्या गटाला झुकते माप देत असल्याचा आरोप वनवे समर्थकांचा होता. पण आता चव्हाणांनी राजीनामा दिल्यामुळे ठाकरे विरोधक पॉवरफुल झाल्याचे दिसते.
नागपुरात विकास ठाकरे विरोधक पॉवरफुल 

नागपूर - विकास ठाकरे यांना कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून हटविण्यात यावे अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांनी केली. आमदार तसेच कॉंग्रसचे निरीक्षक नसिम खान यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण शहराध्यक्ष विकास ठाकरेंच्या गटाला झुकते माप देत असल्याचा आरोप वनवे समर्थकांचा होता. पण आता चव्हाणांनी राजीनामा दिल्यामुळे ठाकरे विरोधक पॉवरफुल झाल्याचे दिसते. 

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे यांनी संजय महाकाळकर यांची नियुक्ती केली होती. कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शवला. स्वीकृत सदस्य म्हणून ठाकरे यांना महापालिकेत येण्यापासून रोखण्यासाठी नगरसेवकांमध्ये दोन गट पडले. त्यांनी महाकाळ यांना हटविले. त्याऐवजी तानाजी वनवे यांची नियुक्ती केली होती. हा वाद न्यायालयापर्यंत पोहचला होता. ही फूट अजूनही कायम आहे.

दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने अद्याप महापालिकेत अस्थिरतेचे वातावरण आहे. मात्र शहर कॉंग्रेस ठाकरे यांच्याच ताब्यात आहे. त्यांच्या समर्थकांची संख्याही मोठी आहे. ठाकरे यांचा कार्यकाळ संपलेला आहे. मात्र घोळामुळे येथील निवडणूक होल्डवर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे यांचे अध्यक्षपदही कायम आहे. आता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. ते ठाकरे गटाला झुकते माप देत असल्याचा आरोप होता. आता प्रदेशाध्यक्ष बदलल्याने ठकरे यांच्या विरोधकांना बळ मिळाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com