नागपुरातील एलईडी घोटाळ्याचा सूत्रधार कोण?

एवढ्या चढ्या दराने निविदा मंजूर करण्यासाठी स्थायी समितीवर कुणाचा दबाव होता, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
नागपुरातील एलईडी घोटाळ्याचा सूत्रधार कोण?

नागपूर: नागपूर महापालिकेतील शंभर कोटींच्या एलईडी घोटाळ्याचे पडसाद आता उमटू लागले असून या घोटाळ्याचे सूत्रधार कोण? याकडे आता लक्ष लागले आहे. भाजपचे  वर्चस्व असलेल्या महापालिकेतील घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर उच्च न्यायालयाने प्रशासनाला नोटीस बजावल्याने 'पार्टी विथ डिफरन्स'चा मुखवटा गळून पडला आहे.

गेल्या 15 वर्षांपासून नागपूर महापालिकेत भाजप सत्तेत आहे . त्यामुळे  भाजपचे नेते एलईडी लाईटच्या घोटाळ्यात आता चांगलेच अडचणीत आले आहेत. वर्तमानपत्रांमध्ये या गैरव्यवहारावराच्या बातम्या प्रकाशित झाल्याने उच्च न्यायालयाने दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली. एलईडी लाईटच्या फिटिंगसाठी बाजारात 3360 रुपये दर आहे. मात्र महापालिकेने कंत्राटदाराला 9900 रुपये प्रति एलईडी लाईट दर देण्याचे निश्‍चित केले.

एलईडी लाईटच्या घोटाळ्यामुळे महापालिकेतील विश्वासू  पदाधिकाऱ्यांची कानउघडणी होण्याची शक्‍यता आहे. गेल्या 15 वर्षात महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना एवढ्या मोठ्या गैरव्यवहाराचे आरोप झाले नव्हते. या गैरव्यवहाराची दखल उच्च न्यायालयाने घेतल्याने भाजपने आतापर्यंत जपलेल्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनातही उमटण्याची शक्‍यता आहे. या गैरव्यवहाराचा सूत्रधार कोण आहे, हे शोधण्यासाठी   आता भाजपचे वरिष्ठ नेते कामाला लागल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com