वर्धा मतदारसंघात रामदास तडस यांच्याजागी सागर मेघे?

गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार सागर मेघे होते. माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपुत्र असलेल्या सागर मेघे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात एकेकाळी मेघे यांचे समर्थक असलेले रामदास तडस यांना भाजपने उमेदवारी दिली होती. रामदास तडस 'डमी' उमेदवार असल्याचा प्रचार केला जात होता. परंतू, रामदास तडस यांनी सागर मेघे यांचा पराभव करून सर्वांना धक्का दिला.
वर्धा मतदारसंघात रामदास तडस यांच्याजागी सागर मेघे?

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून पुन्हा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील नावाजलेले नाव असलेल्या सागर मेघे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेने पुन्हा रामदास तडस यांच्या पुनवर्सनाचा प्रश्‍न भाजपसमोर राहणार आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपने कब्जा केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत रामदास तडस यांनी अनपेक्षितपणे कॉंग्रेसचा पराभव करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता.

गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार सागर मेघे होते. माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपुत्र असलेल्या सागर मेघे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात एकेकाळी मेघे यांचे समर्थक असलेले रामदास तडस यांना भाजपने उमेदवारी दिली होती. रामदास तडस 'डमी' उमेदवार असल्याचा प्रचार केला जात होता. परंतू, रामदास तडस यांनी सागर मेघे यांचा पराभव करून सर्वांना धक्का दिला.

लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा या जिल्ह्यातील राजकारण बदलले. दत्ता मेघे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. वर्धा येथून सागर मेघे यांना खासदार म्हणून निवडून आणण्याची दत्ता मेघे यांची इच्छा आहे. यानुसार पुन्हा सागर मेघे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशी गळ घातली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मेघे समर्थक सागर मेघे यांच्या छायाचित्रांसह सोशल मिडीयावर पोस्ट टाकल्या जात असल्याने वर्धा निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील मेघे समर्थकही सागर मेघे यांनी निवडणूक लढवावी, या मताचे आहेत.

सागर मेघे यांना उमेदवारी दिल्यास रामदास तडस यांचे पुनर्वसन कसे करावयाचे? हा मुख्य प्रश्‍न भाजपसमोर आहे. तडस तेली समाजाचे आहे. या मतदारसंघात तेली समाजाचा मोठा प्रभाव आहे. या समाजाच्या समर्थनाशिवाय या जिल्ह्यातील राजकारण यशस्वी होऊ शकत नसल्याने रामदास तडस यांची नाराजी परवडणारी नाही. तडस यांची उमेदवारी कापून सागर मेघे यांना उमेदवारी दिल्यास तेली समाजात नाराजी पसरण्याची शक्‍यता आहे. रामदास तडस यांना देवळी या विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळण्याचे आमिष मिळण्याची शक्‍यता आहे. यासाठी रामदास तडस राजी झाल्यास सागर मेघे यांचा मार्ग मोकळा होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com