खडसे समर्थक आमदार उदेसिंग पाडवींचे तिकिट कापले

शहादा (जि.नंदुरबार) विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक उदेसिंग पाडवी यांचे तिकिट भाजपने कापले असून त्यांच्याजागी त्यांचे पुत्र मुंबईत पोलिस अधिकारी असलेल्या राजेश पाडवी यांना जाहीर केले आहे.
Udesinh Padvi - Rajesh Padvi.
Udesinh Padvi - Rajesh Padvi.

नंदुरबार : शहादा (जि.नंदुरबार) विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक उदेसिंग पाडवी यांचे तिकिट भाजपने कापले असून त्यांच्याजागी त्यांचे पुत्र मुंबईत पोलिस अधिकारी असलेल्या राजेश पाडवी यांना जाहीर केले आहे. भाजपने काही विद्यमान आमदारांचे तिकिट कापण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात नंदुरबार जिल्ह्यातून श्री. पाडवी यांचा समावेश झाला आहे.

शहादा मतदारसंघातून गेल्यावेळेला उदेसिंग पाडवी अवघ्या सातशे मतांनी निवडून आले होते. गेल्या पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघात बऱ्यापैकी कामे केली असली तरी एकनाथ खडसे यांचे समर्थक म्हणून गेल्या दोन वर्षांपासूनत्यांना डावलण्यात येत असल्याची त्यांची भावना होती. 

दुसरीकडे पक्षाच्या उत्तर महाराष्टस्तरिय वरिष्ठ नेत्यांशी काही विषयांवरून त्यांचे मतभेदही झाले होते. त्यांचा नेत्यांशी झालेला काही संवादही त्यांचा पत्ता कट करण्यात कारणीभूत ठरला आहे. दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने ते आता सोमावलहून तळोदा येथे निघाले असून लगेच कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यात ते पुढील दिशा जाहीर करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com