Rahul Aher- Ke Da Aher- Bhushan Kasliwal
Rahul Aher- Ke Da Aher- Bhushan Kasliwal

भाजपचे चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेरांपुढे उमेदवारीसाठी भाऊबंदकीचे आव्हान ? 

चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघात आमदार डॉ. राहुल आहेर यांचा सर्वाधीक कामे केल्याचा दावा आहे. मात्र यंदा निवडणुकीआधी त्यांना उमेदवारीच्या दिव्यातून जावे लागणार आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अन्‌ त्यांचे बंधू केदा आहेर यांनीच उमेदवारी मागीतली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी भाऊबंदकीचा अध्याय रंगणार आहे. समेट न झाल्यास चांदवडचे नगराध्यक्ष भूषण चांदवडकर देखील रांगेत आहेत. त्यामुळे डॉ. राहुल आहेर सध्या दिवसरात्र मतदारसंघात पायपीट करीत आहेत.

नाशिक : चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघात आमदार डॉ. राहुल आहेर यांचा सर्वाधीक कामे केल्याचा दावा आहे. मात्र यंदा निवडणुकीआधी त्यांना उमेदवारीच्या दिव्यातून जावे लागणार आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अन्‌ त्यांचे बंधू केदा आहेर यांनीच उमेदवारी मागीतली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी भाऊबंदकीचा अध्याय रंगणार आहे. समेट न झाल्यास चांदवडचे नगराध्यक्ष भूषण चांदवडकर देखील रांगेत आहेत. त्यामुळे डॉ. राहुल आहेर सध्या दिवसरात्र मतदारसंघात पायपीट करीत आहेत.

दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या चांदवड मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांनी गेले पाच वर्षे वॉटरकप, जलसंधारण, सिंचन आणि रस्त्यांच्या कामांसाठी सर्वाधीक निधी मिळवल्याचा दावा केला जातो. मतदारसंघात सध्या त्यांचे रोज विविध गावांत कार्यक्रम होत आहेत. मात्र असे असले तरी पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखतीत त्यांना यंदा पक्षातील अन्‌ घरातल्यांनीच आव्हान देण्याचा प्रय्तन केला आहे. 

उमेदवारीसाठी चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, त्यांचे चुलतबंधू जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर, पक्षाचे देवळा तालुका अध्यक्ष राजेंद्र देवरे यांनी मुलाखती दिल्या. कासलीवाल आणि केदा आहेर गांभीर्याने इच्छुक आहेत. पक्षातील नेत्यांशी त्यांचे संबंध आणि कार्यकर्त्यांतील प्रभाव पाहता भाजपमध्ये उमेदवारीची स्पर्धी टोकदार होण्याची चिन्हे आहेत.

चांदवड- देवळा मतदारसंघ हा भौगोलीक राजकीय वादात अडकलेला मतदारसंघ आहे. यामध्ये देवळ्यात 1.03 लाख तर चांदवडला 1.89 लाख मतदार आहेत. यातील उमराणे (देवळा) गटात पंधरा हजार मते आहेत. हे मतदार चांदवडकडे वळतात. त्यामुळे भौगोलीक वादात गतवर्षी चांदवडचे चार उमेदवार होते. 2014 च्या निवडणूकीत कॉंग्रेसचे शिरीष कोतवाल- 43,785, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उत्तमबाबा भालेराव- 27,295, अपक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे- 29,409 आणि शिवसेनेचे नितीन आहेर- 19,032 मते तर भाजपचे डॉ. राहुल आहेर (देवळा) 54,946 मते मिळवून विजयी झाले होते. 

थोडक्‍यात चांदवडच्या चार उमेदवारांना 1.19 लाख मते होती. ही विभागणी डॉ. आहेर यांच्या पत्थ्यावर पडली. यंदा डॉ. आहेर यांना होमपीच देवळा अन्‌ घरातले प्रतिस्पर्धी केदा आहेर यांच्याशी समेट घडवावा लागेल. हे घरचे रण जिंकल्यावर चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्याशी पक्षीय पातळीवर समन्वय निर्माण करावा लागेल. हे दोन्ही विषय प्रचारातून निवडणूक जिंकण्यापेक्षाही अवघड आहेत. त्यामुळे सध्या तरी भाजपचे डॉ. आहेर यांच्यापुढे सध्या भाऊबंदकीचे आव्हान आहे.

लोकसभा निर्णायक....नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत मात्र चित्र पुर्णतः वेगळे होते. यावेळी भाजपच्या भारती पवार यांना 1.20 लाख तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांना 40,084 आणि वंचित आघाडीला 10,048 मते मिळाली होती. त्याची पुनरावृत्ती होणार का असा प्रश्न आहे. तसे झाल्यास विधानसभेला राजकारणाचे वारे उलटे वाहतील.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com