दुष्काळाने उडवली आमदार - खासदारांची झोप !

नागरीकांतील प्रचंड नाराजीने राजकीय नेते, आमदार, खासदारांची झोप उडाली आहे.
girish_mahajan
girish_mahajan

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात निवडणुकीच्या उत्सुकतेपेक्षाही नागीरकांत दुष्काळाबाबत जास्त चिंता आहे. मे महिन्याच्या सुरवातीलाच टॅंकरची संख्या बाराशेवर गेली आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघात वीस लाख नागरीक पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबुन आहे.

नागरीकांतील या प्रचंड नाराजीने राजकीय नेते, आमदार, खासदारांची झोप उडाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आजपासून सिन्नर येथुन दुष्काळ दौरा सुरु केला. त्यांन त्यांना रिकाम्या भांड्याचे दर्शन घडले. 

लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 मे रोजी  मतमोजणी होणार आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी नेत्यांनी सुरु केली आहे. त्यादृष्टीने लोकांमध्ये जाणाऱ्या नेत्यांना टंचाईच्या भीषण वास्तवाला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपासून विविध मंत्री उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आजपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.

पहिल्याच दिवशी ते चार तालुक्‍यांतील वीस गावांना धावत्या भेटी देतील. मात्र या गावांत त्यांचे स्वागत वस्त्यांवर पाण्याच्या प्रतिक्षेत असलेले रिकामे ठेवलेले ड्रम, पाण्याच्या भांड्यांनी होईल. 

येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. नेत्यांनी त्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी आमदार, खासदारांना दौरे करावे लागत आहेत. या दौऱ्यांत नागरीकांकडून अतिशय तीव्र संतापाला सामोरे जावे लागत आहे. नेत्यांना हवी आहेत मते तर नागरीकांना तहान आहे पाण्याची. त्याची झळ सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांच्या नेत्यांना बसते आहे. त्यामुळे लवकरच यावरुन राजकीय आरोप, प्रत्यारोप होण्याचीही शक्‍यता आहे. 

उत्तर महाराष्ट्रात चार हजार 273 गावांतील वीस लाख लोक सध्या टॅंकरवर अवलंबुन आहे. यामध्ये कंसात गावे, नाशिक- 4.82 लाख (872), धुळे- 77 हजार (62), जळगाव- 3.15 लाख (306), नगर- 11.26 लाख (3205) आहेत. नंदुरबार वगळता इतर चारही जिल्ह्यांत टॅंकरची संख्या मोठी आहे.

दुर्गम आदिवासी आणि ग्रामीण भागातून मजुरांचे तांडेच्या तांडे शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहेत. नाशिकला गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक गोदावरीच्या आश्रयाला आले आहेत. साडेचार हजारांवर गावांतील पाणीप्रश्‍न सोडवायला टॅंकरसोबतच विहिरी अधिग्रहण जोरात सुरू आहे. आतापर्यंत प्रशासनाने गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच टॅंकर भरण्यासाठी 566 विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com