औरंगाबाद: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यास माझा विरोध नाही, असण्याचे कारण नाही. त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी मी प्रयत्न केले होते असे सांगत राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आपला अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिल्यास विरोध असणार नाही असे स्पष्ट केले.
नाशिक येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भुजबळ बोलत होते. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदा संदर्भात विचारले तेव्हा भुजबळ म्हणाले, पक्षात कुणाला कोणते पद द्यायचे याचा अधिक आमचे नेते शरद पवारांना आहेत.
ते योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी सोपवतील. अजित पवार यांच्या बाबतीत देखील पवार साहेब निर्णय घेतील. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिल्यास माझा विरोध असण्याचे कारण नाही याचा पुनरुच्चार भुजबळ यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.