आमदार आसिफ शेख यांचा रिक्षातून प्रचाराचा फंडा

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आसिफ शेख व एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहंमद यांनी निवडणूक जाहीर होण्यापुर्वीच प्रचार सुरु केला आहे. आमदार शेख मतदारसंघात रिक्षातून प्रचार करीत आहेत. घरोघरी भेटी दिल्यानंतर त्यांचा रिक्षाचा प्रवास दिवसभर सुरु असतो.
Malegaon MLA Asif Shaikh Campaigning in Rikshaw
Malegaon MLA Asif Shaikh Campaigning in Rikshaw

मालेगाव : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आसिफ शेख व एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहंमद यांनी निवडणूक जाहीर होण्यापुर्वीच प्रचार सुरु केला आहे. आमदार शेख मतदारसंघात रिक्षातून प्रचार करीत आहेत. घरोघरी भेटी दिल्यानंतर त्यांचा रिक्षाचा प्रवास दिवसभर सुरु असतो. 

शहरातील गल्ली-मोहल्ल्यातील बहुसंख्य रस्ते अरुंद आहेत. शिवाय प्रमुख रस्त्यांना अतिक्रमणाने वेढले आहे. त्यामुळे रिक्षातून फिरणे सोपे जाते. मुळात मालेगाव हे दाट लोकवस्तीचे शहर आहे. येथे शंभरावर झोपडपट्ट्या आहेत. बल्ली-पञ्यांचे व लाकडी फाळक्यांची घरेही येथे मोठ्या संख्येने आहेत. झोपडपट्टी व दाट लोकवस्तीच्या भागातील रस्ते अरुंद आहेत. मोठी चारचाकी वाहने या रस्त्यांवरुन धावत असली तरी सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. आमदार शेख यांची कॉंग्रेसकडून पुन्हा उमेदवारी निश्‍चित आहे. त्यामुळे ते महिन्यापासून प्रचाराला लागले आहेत. 

घरोघरी भेटी देतानाच त्यांनी रिक्षातून प्रचार करण्याचा फंडा निवडला आहे. दोन मोजक्या कार्यकर्त्यांसोबत ते दिवसभर मतदारसंघात फिरत असतात. सकाळी दहा ते रात्री उशिरापर्यंत ते भाड्याच्या रिक्षाने मतदारसंघात मतदारांशी संपर्क साधत आहेत. आमदार शेख यांचे पिता रशीद शेख हे येथील महापौर आहेत. त्यांना महापालिकेने वाहन दिले आहे. महापौर शेख हे रोज रिक्षाचाच सर्वाधिक वापर करतात. अनेक वेळा ते रिक्षाने महापालिकेत येतात. रिक्षाचा रोजचा वापर असल्याने महापौरांनी स्वत:ची रिक्षा विकत घेतली आहे. सध्या शेख पिता-पुत्र प्रचारासाठी रिक्षांचा वापर करत असल्याने तो येथे चर्चेचा विषय आहे.

रिक्षातून फिरल्यामुळे सामान्य नागरिकांना सहज भेटता येते. मतदारांशी नाते अधिक दृढ होते. पार्किंगची समस्या राहत नाही. कोणत्याही भागात तात्काळ पोहोचता येते- आसिफ शेख, आमदार, मालेगाव मध्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com