नदी स्वच्छतेसाठी राज्यमंत्री दाद भुसे उतरले मोसम नदीपात्रात 

मालेगावची ओळख असलेल्या मोसम नदीची अवस्था अक्षरशः गटारासारखी झाली आहे. ही नदी स्वच्छ करण्यासाठी आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे शिवसेनेच्या पदाधिका-यांसह नदीपात्रात उतरले होते. स्वच्छता करताना त्यांनी स्वतः कचरा गोळा केला. त्यांच्या प्रोत्साहनाने अनेकांनी या मोहिमेत भाग गेतल्याने यावेळी साठ टन कचरा नदीतुन काढण्यात आला.
नदी स्वच्छतेसाठी राज्यमंत्री दाद भुसे उतरले मोसम नदीपात्रात 

मालेगाव : मालेगावची ओळख असलेल्या मोसम नदीची अवस्था अक्षरशः गटारासारखी झाली आहे. ही नदी स्वच्छ करण्यासाठी आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे शिवसेनेच्या पदाधिका-यांसह नदीपात्रात उतरले होते. स्वच्छता करताना त्यांनी स्वतः कचरा गोळा केला. त्यांच्या प्रोत्साहनाने अनेकांनी या मोहिमेत भाग गेतल्याने यावेळी साठ टन कचरा नदीतुन काढण्यात आला. 

मालेगावच्या मोसम नदी स्वच्छतेसाठी आज महापालिका, महसूल, पोलिस, पंचायत समितीच्या यंत्रणा सरसावल्या. त्यांना शिवसेना, स्वस्त धान्य दुकान संघटना, राष्ट्रीय एकात्मता समिती, शिक्षक संघटना, तालुका क्रशर संघटना व वीटभट्टी प्रतिनिधींनी सहाय्य केले. यावेळी शिवसेना नेते तथा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे स्वतः नदीपात्रात उतरले. सुमारे तीन तास त्यांनी नदीपात्राच्या स्वच्छतेत भाग घेतला. कार्यकर्ते, पदाधिका-यांनाही त्यांनी स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी राज्यमंत्री भुसे यांनी अक्षरशः नदीपात्रातील सांडपाण्याच्या डबक्यांत उतरुन सफाई केली. अडथळ्याचे खडक फोडून सांडपाणी वाहते केले. 

नदीपात्रात मधोमध पाणी वाहणारा नाला तयार व्हावा यासाठी भुसे यांचा सायंकाळपर्यंत लकडा सुरु होता. मोहिम संपवून अधिकारी, कार्यालयात परतल्यानंतरही शिवसेना नगरसेवक व कार्यकर्ते स्वच्छता मोहिम राबवित होते. नदीच्या स्वच्छता मोहिमेत १५ जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला. यातून निघालेला कचरा वाहन्यासाठी १५ ट्रॅक्टर, २ डम्पर, ३ टिप्परचा वापर करण्यात आला. त्यात आज साठ टन कचरा काढण्यात आला. तुंबलेले सांडपाणी प्रवाही करण्यासाठी नदीपात्रात खडक फोडण्यासाठी ब्रेकरचा वापर झाला. एक हजाराहून अधिक नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.  

महापालिका आयुक्त संगिता धायगुडे, अपर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, तहसिलदार ज्योती देवरे, उपअधिक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे आदींनी या मोहिमेचे संयोजन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com