काँग्रेस नेते राजीव शुक्लांची त्र्यंबकेश्वरला कालसर्प पुजा

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या विविध मंदिरांना भेटी चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते तसेच भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी खासदार राजील शुक्ला यांनी त्र्यंबकेश्र्वर येथे कालसर्प पुजा केली. त्यांचा हा अत्यंत खासगी दौरा असल्याने त्यांनी माध्यमांशी संवाद टाळला.
काँग्रेस नेते राजीव शुक्लांची त्र्यंबकेश्वरला कालसर्प पुजा

नाशिक : काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या विविध मंदिरांना भेटी चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर कॅंग्रेसचे नेते तसेच भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी खासदार राजील शुक्ला यांनी त्र्यंबकेश्र्वर येथे कालसर्प पुजा केली. त्यांचा हा अत्यंत खासगी दौरा असल्याने त्यांनी माध्यमांशी संवाद टाळला. 

आज साकळी खासदार शुक्ला पत्नी अनुराधाप्रसाद शुक्ला यांच्या समवेत विशेष हेलीकाॅप्टरने आले. पुरोहीत विजयराज अकोलकर यांच्या निवासस्थानी त्यांचे आगमण झाले. तिथेच ही पुजा झाली. अकोलकर यांनी पौरोहित्य केले. शुक्ला यांचा हा अत्यंत खासजगी दौरा असला तरीही त्यांची बातमी कळल्यावर अनेक नागरीकांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ही भेट टाळली. 

''आज फक्त धार्मिक कार्यक्रमासाठी आलो आहे. त्यामुळे अन्य कोणतीही चर्चा नको', असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, मध्य प्रदेशचे मुख्य़मंत्री शिवराजसिंह चौहान यांसह विविध राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी त्र्यंबकेश्वरला धार्मिक दौरा केला होता. या पार्श्वभूमीवर हा दौरा चर्चेचा विषय ठरला नसता तरच नवल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com