नाशिकमधूनच भाजपला संजय राऊत देणार पहिला धक्का

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू आहे.
nashik bjp former deputy mayor meets shivsena leader sanjay raut
nashik bjp former deputy mayor meets shivsena leader sanjay raut

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू आहे. नाशिकच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज राणेंवर हल्लाबोल सुरूच ठेवला. याचवेळी त्यांनी भाजपला नाशिकमध्ये धक्का देण्याची तयारी केली आहे. 

संजय राऊत हे नाशिकमध्ये आले असताना आज त्यांची भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी भेट घेतली. भाजपात गळचेपी होत असून बोलू दिल जात नसल्याचा आरोप गिते यांनी केला आहे. यामुळे गिते हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाचा तारीख मात्र, अद्याप निश्चित झालेली नाही. लवकरच त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. प्रथमेश हे वसंत गिते यांचे पुत्र आहेत. वसंत गिते यांनी शिवसेनेत आधीच प्रवेश केला आहे. 

राणे यांनी मुख्यमंत्री शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोहीम सुरू केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपला आणि राणेंना जशास तसे उत्तर देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. याचबरोबर भाजपला जिथे शक्य आहे तिथे धक्का देण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. यामुळे आजच्या नाशिक दौऱ्यात संजय राऊत यांनी भाजपला धक्का देण्याची खेळी खेळली आहे. 

संजय राऊत यांनी आज पुन्हा राणेंवर जोरदार टीका केली. नाशिकमध्ये आयोजित सभेत राऊत म्हणाले की, प्रधानमंत्री मोदींनी नवीन मंत्र्यांना भागात जाऊन केंद्र सरकार करत असलेल्या कामाची माहिती जनतेला देण्यास सांगितले होते. सरकारच्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी त्यांनी नव्या मंत्र्यांना दिली होती. मोदींनी सांगितलंय असे राणे म्हणत आहेत पण त्यांनी काय सांगितले हे मलाही माहिती आहे. परंतु, हा एक अतिशहाणा असून, त्याने भाजपचे ऐकलं नाही. केंद्र सरकार, मोदींचा प्रचार न करता राणे हे शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत, महाविकास आघाडीवर टीका करीत आहेत. 

वारंवार जीभ घसरल्यानंतर एकदा कायदेशीर लगाम घालणे आवश्यक होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो लगाम घातला. मंत्र्यांची भाषा ही सभ्य असावी. घटनेची शपथ घेतली आहे अशा व्यक्तीने सभ्यता आणि त्या पदाची प्रतिष्ठा सांभाळायला हवी. नारायण राणे हे महाराष्ट्राच्या विमानतळावर मंत्री म्हणून उतरल्यापासून त्यांची जीभ सातत्याने घसरत आहे. त्यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे . त्यांच्या सध्याच्या पक्षाने याचा विचार करावा. सध्याचा पक्ष कारण की, उद्याचे मला माहिती नाही. राणे मंत्री झाल्यापासून भाजप दररोज दहा फूट मागे जात आहे. भाजपला लवकरच आपली चूक लक्षात येईल, असेही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com