तुकाराम मुंढेंना पुन्हा पाठवा यासाठी अंजली दमानीयांसह नाशिककर गुरुवारी रस्त्यावर! 

'नाशिककर रस्त्यावर उतरणार, तुकाराम मुंढेंना परत आणणार', 'नाशिकला मुंढे हवेच हवेत' या टॅगलाईन अंतर्गत हे आंदोलन होत आहेत. यासंदर्भात सोशल मिडीयावर सुरु असलेल्या प्रचार मोहिमेत "लोकप्रतिनिधींनो बदलीची कारणे द्या'' हे अभियान राबविणार जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहेत. त्याचा भाग म्हणुन जनहितार्थ याचिका दाखल केली जाणार आहे.
Anjali Damaniya-Tukaram Mundhe
Anjali Damaniya-Tukaram Mundhe

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदलीनंतर मंत्रालयात नियोजन सह सचिव पदी नियुक्ती झाली. त्यांनी पदभार स्विकारला. मात्र, नाशिककर अद्याप राज्य सरकारचा हा निर्णय व बदलीचे वास्तव स्विकारायला तयार नाही. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना पुन्हा आयुक्तपदी नेमावे, यासाठी गुरुवारी (ता.29) 'मी नाशिककर' बॅनर खाली ते रस्त्यावर उतरणार आहेत. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया या देखील त्यात सहभागी होतील. 

'नाशिककर रस्त्यावर उतरणार, तुकाराम मुंढेंना परत आणणार', 'नाशिकला मुंढे हवेच हवेत' या टॅगलाईन अंतर्गत हे आंदोलन होत आहेत. यासंदर्भात सोशल मिडीयावर सुरु असलेल्या प्रचार मोहिमेत "लोकप्रतिनिधींनो बदलीची कारणे द्या'' हे अभियान राबविणार जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहेत. त्याचा भाग म्हणुन जनहितार्थ याचिका दाखल केली जाणार आहे. गुरुवारी (ता.29) सकाळी नऊला गोल्फ क्‍लब जॉगींग ट्रॅक सिग्नल, सावरकर तरण तलाव, त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, खडकाळी सिग्नल, शालीमार मार्गे आंबेडकर पुतळा या मार्गाने मोर्चा काढला जाईल.

त्यात अंजली दमानीया सहभागी होतील. आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी ही एकमेव मागणी घेऊन हे आंदोलन केले जाईल. 'प्रामाणिक अधिकाऱ्यांवर अन्याय होतो. त्यांची वारंवार बदली केली जाते. त्यातुन भ्रष्टाचाराला संरक्षण तर राजकीय नेत्यांचे हित पाहिले जाते. असे करणाऱ्यांना मतदान करणार नाही,' अशी मोहिम राबविली जाईल, अशी माहिती संयोजक जितेंद्र भावे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com