#COVID2019 नाशिकरोड कारागृहाला 25 हजार मास्कची आर्डर

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 25 हजार मास्क तयार करण्याची आर्डर मिळाली आहे. खासगी संस्थेने ही ही आर्डर दिली आहे. कारागृह प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे
Nashik Road Prison Making Anti Corona Masks
Nashik Road Prison Making Anti Corona Masks

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 25 हजार मास्क तयार करण्याची आर्डर मिळाली आहे. खासगी संस्थेने ही ही आर्डर दिली आहे. कारागृह प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

कोरोनामुळे बाजारात मास्कचा मोठी टंचाई असल्याने जास्त दराने मास्क विक्री होत आहे. गरजूंना मास्क उपलब्ध व्हावेत म्हणून एका संस्थेने कारागृहाला २५ हजार मास्कची ऑर्डर दिली. बंदी बांधव हे काम करत आहेत. कारागृहात तीन हजार बंदी असून चारशे अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांनाही प्रशासनाने मास्क वाटून ते लावण्याचे आदेश दिले आहेत. कैदी व कर्मचा-यांनी करोना टाळण्यासाठी काय करावे व करु नये याची प्रत्येक बराकीत पत्रके लावण्यात आली आहेत.

बाहेरुन कर्मचारी किंवा अन्य व्यक्तीला कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी साबणाने हात धुवावे लागतात. कारागृहाचे डॉ. सचिन कुमावत, डॉ. ससाणे हे त्यांची आरोग्य तपासणी करतात. प्रत्येक बंदीबांधव, कर्मचारी व अधिका-याचे दररोज तापमान घेतले जात आहे. कैद्यांनी एकाच ठिकाणी थांबू नये म्हणून कामानंतर ग्रंथालयात, कॅरम, व्हाॅलीबाल, बुध्दीबळ खेळण्यासाठी पाठवले जात आहे. महापालिकेच्या कर्मचा-यांना बोलावून कारागृहात औषध फवारणी करण्यात आली आहे.

कारागृहात तीन हजार कैदी आहेत. कारागृह म्हणजे एक गावच आहे. कोरोनासारख्या विषाणूची लागण एका जरी कैद्याला झाली तरी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. औरंगाबादचे कारागृह उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील कैद्यांचाच स्वीकार सुरु केला आहे. बाहेरच्या कैद्यांना संबंधित जिल्हा कारागृहातच ठेवण्यात येणार आहे. नाशिकमधून आलेल्या कैद्यांची प्रथम जिल्हा रुग्णालयात तपासणी होते. मग कारागृहातील कोरोना वार्डात पंधरा दिवस स्वतंत्र ठेवले जाते. 

कारागृहाची क्षमता दीड हजार असताना तीन हजार कैदी झाले आहेत. गर्दी कमी करण्यासाठी जामीनपात्र कच्च्या कैद्यांना त्वरित जामीनावर सोडण्याची विनंती कारागृहाने कोर्टाला केली आहे. कैद्यांना कोर्टात न नेता व्हिडीओ काॅन्फरन्सिंगव्दारा सुनावणी घेतली जात आहे. कैद्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून दररोज सुमारे पाचशे नातेवाईक येतात. करोनामुळे त्यांना तसेच कैद्यांच्या वकिलांना ३१ मार्चपर्यंत येथे बंदी आहे. कैदी आणि कर्मचारी यांना साडेतीन हजार मास्कचे वाटप झाले असून प्रत्येकाला मास्क सक्तीचा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com