उपमहापौर प्रथमेश गिते 25 नोव्हेबरला चढणार बोहल्यावर 

Nasik-GITE
Nasik-GITE

नाशिक   :  महापालिकेचे उपमहापौर, भाजपचे युवा नेते प्रथमेश गिते येत्या 25 नोव्हेबरला बोहोल्यावर चढणार आहे.

विधी शाखेच्या पदवीधर  किर्ती वैद्य या नियोजित वधुशी ते विवाहबंधनात अडकतील. सत्तेत असतांना बोहोल्यावर चढणारे ते नाशिकचे पहिलेच उपमहापौर आहेत.

 प्रथमेश गिते एचपीटी महाविद्यालयातून बी. ए. ची. पदवीधर आहेत. माजी महापौर तथा माजी आमदार, भाजपचे नेते वसंत गिते यांचे ते चिरंजीव आहेत.

गेले काही दिवस राजकीय, सामाजिक कार्यात सक्रीय होते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत ते प्रभाग 15 मधून भाजपच्या उमेदवारीवर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर लगेचच ते उपमहापौर झाले.

मूळचे हिंगोली येथील निवासी  आणि सध्या नाशिक येथे शासकीय कंत्राटदार असलेले प्रदिप वैद्य यांची कन्या किर्ती यांच्याशी त्यांचा हा नियोजित विवाह होत आहे. प्रथमेश यांच्या समवेत त्यांचे चुलत बंधु मयुर यांचा विवाह देखील ओझर येथील सुरेश भडके यांची कन्या काजल यांच्याशी होणार आहे.

सध्या हे दोन्ही कुटुंबीय नाशिक येथे होणा-या या विवाहाच्या तयारीत व्यस्त आहेत. गिते यांचे निकटवर्तीय विवाहाच्या तयारीत व्यस्त आहेत. नाशिकच्या राजकीय वर्तुळातही हा विवाह विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com