इथला 'पाहुणा' निवडून देऊ नका, पार्सल परत पाठवा : उद्धव ठाकरेंकडून छगन भुजबळ लक्ष्य

''येवल्यासाठी विकासाचा 'वचननामा' करावा लागला. मग सत्तेतील आमदार काय करत होते? त्यामुळे आता वेळ आली आहे, इथला पाहुणा निवडून देऊ नका. हे पार्सल परत पाठवून द्या. कुठेही पाठवा पण मुंबईत पाठवू नका,'' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य करीत टीकास्त्र सोडले.
Chagan Bhujbal - Uddhav Thakrey
Chagan Bhujbal - Uddhav Thakrey

येवला : ''येवल्यासाठी विकासाचा 'वचननामा' करावा लागला. मग सत्तेतील आमदार काय करत होते? त्यामुळे आता वेळ आली आहे, इथला पाहुणा निवडून देऊ नका. हे पार्सल परत पाठवून द्या. कुठेही पाठवा पण मुंबईत पाठवू नका,'' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य करीत टीकास्त्र सोडले.

येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समस्या आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी मला महायुतीचे विधानसभेत माझे 288 आमदार हवे आहेत. ठाकरे यांच्या हस्ते उमेदवार संभाजी पवार यांच्या 'वचनानामा'चे प्रकाशन झाले.

यावेळी खासदार संजय राऊत, खासदार डॉ. भारती पवार, शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, शिवाजी ढवळे, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, ज्येष्ठ नेते ऍड. माणिकराव शिंदे, भाजप नेते नानासाहेब पाटील, डी. के. जगताप, उपसभापती रूपचंद भागवत आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com