भिवंडीत दुरूस्त केलेल्या 'एमएमआरडीए'च्या शौचालयांच्या दुरुस्ती कामात भ्रष्टाचार : शासनाने मागितला अहवाल

भिवंडीत दुरूस्त केलेल्या 'एमएमआरडीए'च्या शौचालयांच्या दुरुस्ती कामात भ्रष्टाचार : शासनाने मागितला अहवाल
Published on
Updated on

भिवंडी : वारंवार तक्रारी करूनही 'एमएमआरडीए' मार्फत बांधलेल्या शौचालय चालक व ठेकेदारांवर कारवाई करण्याची भिवंडी महापालिकेच्या प्रशासनाची मानसिकता नसल्याने पालिकेचे स्वच्छता अधिकारी व बांधकाम अभियंता यांनी संगनमताने शासनाच्या हगणदारी मुक्त योजनेलाच हरताळ फासल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रामदास दानवले यांनी केला आहे.

शौचालय बांधकाम व दुरुस्ती कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार शासनाने या बाबतीत पालिका आयुक्त व 'एमएमआरडीए'चे अधिकारी यांनी सखोल चौकशी करून अहवाल तातडीने मुख्यमंत्री कार्यालयात सादर करावा असे लेखी आदेश राज्य शासनाचे अव्वल सचिव अजित कवडे यांनी दिले आहेत. त्यामुळे पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.

भिवंडी महानगरपालिकेने 'एमएमआरडीए'च्या निधीतून आठ वर्षापुर्वी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या परिचलन प्रक्रियेत गेल्या सहा वर्षापासून होत असलेल्या भ्रष्ट कारभाराबाबत दानवले यांनी पालिकेकडे तक्रार करीत आहेत. तरी देखील नागरिकांना राजरोसपणो लुटणाऱ्या परिचालकांवर महापालिका अधिका-यांना अंकूश आणता आलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी शासनाच्या वैयक्तीक शौचालय योजनेंतर्गत स्वत:च्या घरांत शौचालय बांधून ते सुरू देखील केले.

परंतू गेल्या आठ महिन्यापासून पालिकेच्या स्वच्छता अधिका-यांनी शासनाकडून मिळणारा निधी त्यांच्या वडिलांना दिलेला नाही. त्यामुळे आम्ही पालिकेचा नियमीत मालमत्ता कर भरतो म्हणजे चूक करतो काय? असा सवाल दानवले यांनी पालिका आयुक्त योगेश म्हसे यांना केला आहे. भिवंडी शहरात 'एमएमआरडीए'च्या निधीतून 27 सार्वजनिक शौचालये बांधली असुन त्यापैकी 21 शौचालये पालिकेने परिचालनासाठी दिली आहेत. उरलेल्या शौचालयांकडे पालिकेचा बांधकाम विभाग, स्वच्छता विभाग व मालमत्ता विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे ते नादुरूस्त झाले. अशा 29 नादुरूस्त शौचालयांसाठी पालिकेने शासनाकडून आलेल्या निधीतून एक कोटी 84 लाख रूपये खर्च केले आणि पुन्हा शौचालयाची बांधकाम दुरूस्ती केली. तरी देखील चाविंद्रा मनपा शाळा क्र.46 च्या आवारात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची काही महिन्यातच दुरावस्था झाली.

उपायुक्तांनी परिचालकाना परिसरांतील कुटुंबांना पास वाटण्याचे लेखी आदेश देऊनही गेल्या दोन वर्षापासून आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. बांधलेल्या शौचालय धारकांना शासनाचा निधी वेळेत न देता ज्यांनी शासनाच्या वैयक्तीक शौचालय निधीच अपहार केला, अशा लाभार्थींवर पोलीस कारवाई करण्यात स्वच्छता अधिकाऱ्यांनी व प्रभाग अधिका-यांनी धन्यता मानली. शहरात अशा प्रकारे शासनाच्या हगणदारी मुक्त योजनेला हरताळ फासणाऱ्या अधिका-यांविरोधात दानवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असता राज्याचे अव्वर सचीव अजीत कवडे यांनी पालिका आयुक्तांना स्वयंस्पष्ट अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.

शौचालय चालक सर्रास नागरिकांची लूट करीत आहेत. पाण्याची विजेची चोरी करीत आहेत. याबाबत पुराव्यासह अनेक तक्रारी पालिकेकडे करूनही पालिकेचे अधिकारी मूग गिळून गप्प बसतात. आज पर्यंत आम्ही पालिकेचा एकही रुपया कर थकविला नाही की बुडविला नाही तरीही आमच्या समस्यांकडे पालिका लक्ष देत नाही

- रामदास दानवले, सामाजिक कार्यकर्ते गायत्रीनगर, भिवंडी

महानगरपालिका हद्दीत एमएमआरडीएच्या निधीतून बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या परिचालकांची चौकशी करून परिसरांतील नागरिकांना पास देण्यासाठी त्या प्रभागातील व विभागातील आरोग्य निरिक्षकांना सांगीतले आहे. तसेच त्यांच्या मार्फत या शौचालयाचा अहवाल देखील मागविला आहे

- सुनिल भालेराव,
सहा.आयुक्त तथा आरोग्य व स्वच्छता विभाग प्रमुख

सरकारनामाच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या -

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com