कुरुंदकर एकनाथ खडसेंचा खबऱ्या असल्याची सांगलीच्या पोलिस अधीक्षकांनी केली होती तक्रार

khadse-kurundkar
khadse-kurundkar

नवी मुंबई  : सहाय्यक पोलिस निरीक्षक आश्‍विनी गोरे-बिंद्रे बेपत्ता प्रकरणातील संशयित आरोपी असलेला पोलिस अधिकारी अभय कुरूंदकर पोलिस दलातील गोपनिय माहिती उघड करायचा. तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना तो ही गोपनिय माहिती पोहचवायचा, अशी  माहिती हाती आली आहे. 

सांगलीचे तत्कालिन पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. 2013 मध्ये पोलिस महासंचालकांना त्यांनी लिहिलेले पत्र   मिळाले आहे. 

सावंत 2010 मध्ये सांगलीत कार्यरत होते. याच काळात कुरूंदकर याने 2 जून 2010 ला सांगली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत निरीक्षक म्हणून रूजू झाला. सेवाकाळात कुरूंदकरने सांगलीतील बडे राजकीय नेते आणि पत्रकारांशी  सलोख्याचे संबंध तयार केले, असे सावंत यांनी पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

कुरूंदकरची कार्यक्षमता चांगली नसल्याने तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आदेशानंतर तासगाव पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कुरुंदकरची बदली करण्यात आली होती. त्या वेळी विरोधी पक्षनेते खडसे यांच्याशई बोलून त्याने बदली रद्द करून घेतली, असा खुलासाही सावंत यांनी पत्रात केला आहे. 

कुरूंदकर रजेच्या कालावधीत विरोधी पक्षनेत्यांना सतत भेटायला जायचा. त्यांना तो जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची गोपनिय माहिती देत असल्याचा संशय सावंत यांनी पत्रात व्यक्त केला आहे.

अनेकदा गुन्ह्याची उकल होण्याआधीच काही गोष्टी पत्रकारांना समजायच्या. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर त्याची तात्काळ बदली करण्याची मागणी सावंत यांनी केली होती. त्यांच्या या पत्रामुळे कुरूंदकरचे राजकीय नेत्यांसोबतचे संबंध उघड झाले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com