नवी मुंबई : स्थायी समितीवरून  शिवसेनेत गोंधळ; कॉंग्रेसमध्ये नाराजी 

नवी मुंबई : स्थायी समितीवरील आठ सदस्यांच्या निवडीवरून नवी मुंबईतील राजकीय पक्षांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. शनिवारी झालेल्या महासभेच्या बैठकीत आठपैकी सात जागांवर राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भाजपने सदस्यांच्या नावांची घोषणा केली.
navi_mumbai_corporaion
navi_mumbai_corporaion

नवी मुंबई  : स्थायी समितीवरील आठ सदस्यांच्या निवडीवरून नवी मुंबईतील राजकीय पक्षांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. शनिवारी झालेल्या महासभेच्या बैठकीत आठपैकी सात जागांवर राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भाजपने सदस्यांच्या नावांची घोषणा केली. मात्र या निवडीवर एकमत होत नसल्यामुळे शिवसेनेकडून सदस्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे; तर कॉंग्रेसकडून पूनम पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्याने ज्येष्ठ नगरसेविकेला डावलल्याची चर्चा आहे. 

दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या सभापती शुभांगी पाटील यांच्यासह अशोक गुरखे, लक्ष्मीकांत पाटील, छाया म्हात्रे, संगीता पाटील निवृत्त होणार आहेत. शिवसेनेतून प्रशांत पाटील, कॉंग्रेसमधून मीरा पाटील, तर भाजपमधून दीपक पवार निवृत्त होणार आहेत. त्यांचा कार्यकाल 1 मे रोजी पूर्ण होत असल्यामुळे त्याआधीच नवीन सदस्य निवडण्यासाठी शनिवारी महासभेत नवीन सदस्यांच्या नावांची घोषणा होणार होती.

 राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काही जुन्या व नव्या चेहऱ्यांना संधी देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेत आधीच दोन गट पडले असल्यामुळे कोणाला स्थायी समितीवर पाठवायचे, याबाबत एकमत होत नाही; परंतु स्थायी समितीचे पद आपल्या पदरात पडावे यासाठी चौगुले गटातील काही नगरसेवकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. 

त्यात जुईनगरमधील नगरसेवकाचे नाव समोर येत होते. मात्र आयत्यावेळेला त्याच्या नावाचीही घोषणा न झाल्याने ठाण्यावरून येणाऱ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत शिवसेनेचे नगरसेवक आहेत; तर कॉंग्रेसमध्ये स्थायी समिती सदस्यपदासाठी एका ज्येष्ठ नगरसेविकेच्या नावाची चर्चा काही दिवसांपासून होती. 

माजी जिल्हाध्यक्षांच्या मदतीने त्यांच्या पत्नीने पक्षाच्या वजनदार नेत्यांकडे गळ घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांनी त्याला 'खो' घातल्यामुळे कॉंग्रेसच्या नवख्या पूनम पाटील यांना स्थायी समितीचे सदस्यत्व मिळाले आहे. यामुळे तब्बल तीन वेळा नगरसेविका होऊनही डावलल्याने अन्यायाच्या भावनेतून नाराजी उफाळून येण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com