...आणि पोलिसांनी बंद केले इंदोरीकर महाराजांचे  कीर्तन .

कीर्तन ही महाराष्ट्राची परंपरा आहे.आपण कीर्तनातुन समाज प्रबोधन करतो.मात्र कायद्याचे बोट दाखवून सुरू असलेले कीर्तन अशा प्रकारे बंद करणे योग्य नाही. असा प्रकार मी पहिल्यांदाच अनुभवला.अधिक बोलणे योग्य नाही.मात्र हा प्रकार निषेधार्थ आहे .इंदोरीकर महाराज
Nivrutti-maharaj-Indorikar
Nivrutti-maharaj-Indorikar
Published on
Updated on

खोपोली :खोपोलीतील शिव प्रेरणा मित्र मंडळ, काटरंग , मोगलवाडी ग्रामस्थ यांच्यातर्फे रविवारी शिवजयंती उत्सवानिमित्त प्रख्यात कीर्तनकार व समाजप्रबोधक इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊ वाजता कीर्तन नियोजनानुसार कीर्तन सुरू झाले. मात्र रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी कीर्तन अतिशय रंगांत असतांना,खोपोली पोलीस किर्तनस्थळी आले व त्यांनी आवाज बंद करण्याचे फर्मान साउंड सिस्टीम आयोजकाला सोडले. 

तसेच फर्मान पाळले नाही तर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे ही सुनावले. त्यानुसार आवाज बंद झाला व गोंधळ निर्माण झाल्याने इंदोरीकर महाराज यांना नाईलाजाने कीर्तन थांबवावे लागले. पोलिसांच्या या कारवाई ने आयोजक व उपस्थित पन्नास हजाराच्या वर नागरिकांनी संताप व्यक्त करीत तीव्र निषेध व्यक्त केला.

पोलिसांनी साउंड सिस्टीमचा आवाज बंद केल्यावर आहे त्या परिस्थितीत इंदोरीकर महाराज यांनी कीर्तन सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.परंतु जवळपास 50 हजाराच्या आसपास जमलेल्या नागरिकांपर्यत आवाज जात नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. उपस्थित नागरिक आवाज -आवाज असे ओरळू लागले व गोधळाची स्थिती निर्माण झाली . 

दरम्यान उत्सव कमिटी , कीर्तन आयोजक व उपस्थित स्थानिक नेत्यांनी एक तास साउंड सिस्टीमचा आवाज लोकांना ऐकू जाईल एवढा तरी सुरू ठेवा अशी विनंती पोलिसांना केली.परंतु सुप्रीम कोर्टाचा नियम व आचारसंहिता यांचा हवाला देत पोलिसांनी आपली कायद्याची भूमिका ताठर ठेवली .  कायद्याचे उल्लंघन झाल्यास आयोजक व साउंड सिस्टीम मालकावर कडक कारवाई करण्याची नोटीसही बजावून टाकली . दरम्यान उपस्थित नागरिकांत संताप वाढून स्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती.

या बिघडणाऱ्या  स्थितीचा अंदाज आल्याने कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी  अखेर 10: 30 वाजता आहे त्या स्थितीत कीर्तन थांबवले. दरम्यान पोलिसांच्या या भूमिकेतून येथे गंभीर स्थिती निर्माण झाली होती.परंतु आयोजकांनी व नेत्यांनी सर्वांना समजावत स्थिती नियंत्रणात ठेवली .मात्र या प्रकाराने उपस्थित नागरिक, महिला व कीर्तन आयोजकांनी पोलिसांच्या या कारवाई बाबत संताप व्यक्त केला. यावेळी काही काळ तणावाची स्थितीही निर्माण झाली होती . मात्र नागरिकांनी प्रचंड संयम पाळला .


,खोपोलीचे पोलीस निरीक्षक  के .एस. हेगाजे यांनी सांगितले ,"निवडणूक आचारसंहिता सुरू आहे . रात्री 10 वाजल्या नंतर साउंड व आवाजा बाबत सुप्रीम कोर्टाचा व निवडणूक आयोगाचा स्पष्ट व कडक निर्णय आहे . त्याचे पालन केल्याशिवाय पोलिसांना दुसरा पर्याय नाही.यात कोणाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नाही."

 शिवसेना  शहर प्रमुख   सुनील पाटील म्हणाले ," सदर कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आले होते .आम्ही कारवाई साठी आलेल्या पोलिसांना वारंवार विनवणी केली.वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही संपर्क केला. मात्र त्यांनी काहीही एकूण घेतले नाही .जनभावनाचा सन्मान पोलिसांनी ठेवण्याची आवश्यकता होती. परंतु तसे झाले नाही. पोलिसांच्या या कारवाई ने येथील स्थिती हाताबाहेर जाऊ शकत होती. परंतु सुदैवाने तसे काही घडले नाही . या घटने बाबत शिवसेना पक्ष स्तरावर लवकरच भूमिका घेईल ."


 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com