'नमामि इंद्रायणी' म्हणून नदी स्वच्छ होत नाही ; महेश लांडगेंना अजितदादांचा टोमणा

''केवळ फलकावर नमामि इंद्रायणी म्हणून नदी स्वच्छ होत नाही. त्यातील जलपर्णी निघत नाही,'' असा टोमणा अजित पवार यांनी आमदार महेश लांडगे (bjp MLA Mahesh Landage) यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
Mahesh Landage, Ajit Pawar
Mahesh Landage, Ajit Pawarsarkarnama

पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यभर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शुक्रवारी (ता. १०) ते पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे गुरव येथे घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर (bjp)चौफेर टीका केली.

पालिकेत भ्रष्टाचार बोकाळलाय,पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्ष तथा सभापतींना लाचखोरीत अटक होऊन शहराची बदनामी झाली,आपल्याच माणसाला टेंडर कसे मिळेल हे पाहण्यात व त्यासाठी रिंग करण्यात सत्ताधारी मस्त आहेत,अंकुश नसल्याने सगळेच उधळलेत, धरण भरूनही दररोज पाणीपुरवठा न होता तो दिवसाआड होतो आहे,असा हल्लाबोल त्यांनी केला.

भाजपच्या राजवटीत शहर विकासात मागे पडले, त्यांच्याकडे नियोजन नाही.म्हणून पाणीपुरवठा होणारे मावळातील पवना धरण भरूनही दिवसाआड नागरिकांना मिळते आहे.केंद्र,राज्य व पालिकेत त्यांची सत्ता असूनही अनधिकृत बांधकामाचा, शास्तीकराचा प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. लाचखोरीमुळे त्यांनी शहराची बदनामी केली.दुसरीकडे महागाई आणि इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता चांगली होते असे नागरिक आता बोलून दाखवत आहेत, असे अजित पवार म्हणाले, ''केवळ फलकावर नमामि इंद्रायणी म्हणून नदी स्वच्छ होत नाही. त्यातील जलपर्णी निघत नाही,'' असा टोमणा त्यांनी शहराचे कारभारी भाजपचे शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे (bjp MLA Mahesh Landage) यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

Mahesh Landage, Ajit Pawar
सुप्रियाताई, मन मोठं करा, अजितदादा तुमचं तरी ऐकतात का?

नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात सकाळी ९ ते सायंकाळी ६ असे दिवसभर विविध सत्रात राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ता शिबिर झाले. पहिल्यांदा प्रा. हरी नरके यांनी ओबीसी आरक्षण व दिशाभूल या, तर दुस-या सत्रात विजय चोरमारे यांनी समग्र शरद पवार या विषयावर मार्गदर्शन केले. पार्थ पोफळे यांनी भाजपा सत्तेत का नको यावर कार्यकर्त्यांनी संवाद साधला. सनदी अधिकारी महेश झगडे यांनी शहरी प्रश्न व नागरिकरण या विषयावर मार्गदर्शन केले. प्रविण गायकवाड यांनी मराठा व इतर राजकीय आरक्षणे यासंदर्भात विचार मांडले. आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपा सत्ता काळातील जुलमी कायदे व धोरणे यावर बोलले. प्रास्ताविक शहर सरचिटणीस व प्रवक्ते फजल शेख तसेच अरूण बो-हाडे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com