Pune By Election: धंगेकर, जगतापांनी आधी मानले मतदारांचे आभार, मग घेतली आमदारकीची शपथ

MLA Ravindra Dhangekar: आईचे नाव घेऊन धंगेकरांनी वेधले लक्ष
Ravindra Dhangekar, Ashwini Jagtap
Ravindra Dhangekar, Ashwini JagtapSarkarnama

MLA Ashwini Jagtap: नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाले आहेत. त्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. ती घेताना दोघांनीही प्रथम आपल्या मतदारांचे आभार मानले.

जगताप (Ashwini Jagtap) या विधानसभेवर निवडून जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या महिला आमदार आहेत. त्यांच्याअगोदर भाजपच्या महिला मोर्चाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा उमा खापरे (Uma Khapare) या विधानपरिषदेवर निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आता शहरात दोन पुरुष आणि दोन महिला आमदार झाले आहेत. त्यातून ३३ टक्के नाही, तर पन्नास टक्के महिला आरक्षण आमदारकीत शहराला मिळाले आहे.

आता या दोन महिला आमदारांमार्फतशहरातीलच नाही, तर राज्यातीलही महिलांचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी, चिंचवड (Chinchwad) आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी भोसरी (महेश लांडगे Mahesh Landge) आणि चिंचवड (अश्विनी जगताप) येथे भाजपचे, तर पिंपरीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आमदार आहेत.

Ravindra Dhangekar, Ashwini Jagtap
MNS : सांगितलं होतं ना आपल्या वाट्याला कुणी जायचं नाही, शेवटी मुख्यमंत्रीपद गेलं ना; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

शहरातील जेमतेम दीड वर्षाचा कालावधी मिळणार असल्याने पदाची शपथ घेण्यापूर्वीच अश्विनी जगतापांनी कामाला सुरुवात केली आहे. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. त्यापूर्वीच निवडून येताच चार दिवसांतच त्यांनी सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालय तथा औंध ऊरो रुग्णालयाची पाहणी केली. तेथे रुग्णांना न तपासता तसेच घरी पाठवणाऱ्या डॉक्टरांना फैलावर घेतले होते.

आज शपथ घेताना मतदारांनी जो विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांनी जे कार्य शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केले, त्याच विचाराने जनसेवेसाठी कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Ravindra Dhangekar, Ashwini Jagtap
High Court News : तत्कालीन महसूल राज्यमंत्री सत्तार यांच्या आदेशाने नेमलेली चौकशी समिती रद्द

दरम्यान, तीनवेळा आमदार राहिलेल्या लक्ष्मण जगतापांच्या (Laxman Jagtap) शपथविधीला अश्विनी या गेल्या नव्हत्या. त्यांचे सर्व कुटुंब तिन्ही वेळेला हजर होते. मात्र, विधीमंडळ अधिवेशनाला त्यांनी पतीबरोबर आवर्जून हजेरी लावलेली होती. तेथील कामकाजाची माहिती व्हावी, अभ्यास व्हावा हा हेतू त्यामागे होता. त्यामुळे पहिल्यांदाच त्या आमदार झाल्या असल्या, तरी विधानसभेच्या कामकाजाची त्यांना प्राथमिक माहिती आहे. घरच्यांनी व त्यातही दीर आणि चिंचवडचे भाजप प्रभारी तथा प्रचारप्रमुख शंकर जगताप यांनी दिलेल्या नैतिक पाठिंब्याबद्दल त्यांचे आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी विशेष आभार मानले.

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार धंगेकरांनीही (Ravindra Dhangekar) शपथेला सुरवात करताना कसब्याच्या जनतेचे आभार मानले. तसेच आपल्या नावानंतर वडील हेमराज यांच्याअगोदर आपली आई लक्ष्मीबाई ऊर्फ सुलोचना यांचे नाव घेतल्याने त्याने सभागृहाचे लक्ष वेधले गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com