Chinchwad bye election : "दुःखामुळे घरात राजकीय चर्चाच नसल्याने उमेदवारीचं काहीच ठरलेलं नाही"

Shankar Jagtap : पक्षनिष्ठ असल्याने उमेदवारी मिळेल त्याच्यामागे जगताप कुटुंब : शंकर जगतापांची गुगली
Shankar Jagtap
Shankar JagtapSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad bye election : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. तेथून दिवंगत जगतापांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांचीच नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. त्यांच्यापैकीच एकाला ती मिळेल, अशी दाट शक्यता आहे. मात्र, जगताप कुटुंबाबाहेरील व्यक्तीला जरी उमेदवारी मिळाली, तरी त्याच्यामागे जगताप कुटुंब उभे राहील, अशी ग्वाही शंकर जगताप यांनी बुधवारी रात्री दिली.

गंभीर आजारी असतानाही आ. लक्ष्मण जगताप हे विधानपरिषद निवडणुकीसाठी मुंबईला रुग्णवाहिकेतून गेल्याचा एकनिष्ठतेचा दाखला त्यांनी दिला. भाऊंची ही एकनिष्ठा कुटुंबही पुढे जपणार असल्याचं जगताप यांनी सांगितलं. चिंचवड निवडणूक तयारीच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पिंपरीत घेतलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.

Shankar Jagtap
Thackeray Vs Shinde : शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे दाखल होणार!

शंकर जगताप म्हणाले, "भावाच्या मृत्यूच्या दुःखातून अद्याप सावरलेलो नाही. दुःखाचे वातावरण असल्याने घरात राजकीय चर्चाच झाली नाही. त्यामुळं उमेदवारीबाबत काहीच ठरलेलं नाही. जगताप कुटुंबातीलच कोणाला तिकिट द्यावे, असे आमचं म्हणणं नाही. बाहेरील कोणालाही उमेदवारी दिली तरी, त्यांच्यामागे जगताप कुटुंब उभं राहील."

Shankar Jagtap
Prakash Ambedkar : 'वंचित' भविष्यात भाजपसोबतही आघाडी करू शकते : आंबेडकरांचं सूचक वक्तव्य!

दरम्यान, चिंचवड विधानसभेसाठी जगताप कुटुंबातीलच व त्यातही त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) किंवा बंधू शंकर जगताप यांनाच उमेदवारी देण्याचे भाजपने नक्की केले आहे. त्याची फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. त्याला पक्षाच्या राज्यस्तरावरील एका जबाबदार पदाधिकाऱ्यानेही यास दुजोरा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com